‘HRCT Test’साठी महिला-मुलांना ‘माणदेशी’ करणार आर्थिक मदत : प्रभात सिन्हा

20

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.13मे):-कोरोना संक्रमणाच्या काळात बाधित महिला व 18 वर्षांखालील रुग्णांना माणदेशी फाउंडेशन आर्थिक मदत करणार असल्याची माहिती माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रभात सिन्हा म्हणाले, “सध्या सुरू असलेली कोरोनाच्या साथीच्या संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत विशेषतः महिला व मुलांमध्ये बाधितांची संख्या अधिक आढळत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन माण देशी फाउंडेशनतर्फे बाधित महिलांना व 18 वर्षेखालील रुग्णांना एचआरसीटीसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला आहे.

एचआरटीसी टेस्ट ही प्रत्येक रुग्णांना करणे अनिवार्य असल्याने शिवाय ही सर्वसामान्यांना ब्रेक-द-चेन लॉकडाउन कालावधीत आर्थिक अडचणीत आलेल्या अनेक कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने माण देशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांच्या संकल्पनेतून कोरोना पॉझिटिव्ह महिलांना व 18 वर्षांखालील रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी म्हसवड येथे असणाऱ्या शार्दुल डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये माण आणि खटाव तालुक्‍यांतील एचआरटीसी करण्यास येणाऱ्या बाधित महिलांना व 18 वर्षांखालील रुग्णांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. याबरोबरच विनामूल्य ऑक्‍सिजन मशिन येत्या पाच ते सहा दिवसांसाठी देण्याची योजना सुरू करण्यात येत आहे.”