कोरोणा महामारी पासून बचाव करण्यासाठी बहुतेक गावात माराई मातेचे पूजन

23

🔹यासाठी बहुतांशी महिलांचा उपवास

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.13मे):- ज्याला आपन आराध्यदैवत मानतो त्यांच्यावर जर आपण श्रद्धेने विश्वास दाखवला तर चांगले आजारी असलेले रुग्ण मानसिक रित्या वैचारिक दृष्टिकोनातून बरे होऊ शकतात असे ऐकिवात आहे.मात्र श्रद्धा आणि विश्वासानेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव, खरकाडा, रुई ह्या गावासह अनेक खेडेगावात मध्ये श्रद्धेचा भाग म्हणून मुख्यत्वे महिला ग्रामस्थांतर्फे माराई मातेवर दररोज सात दिवस पाणी टाकून पूजाअर्चा केली जात असून ह्या उद्भवणाऱ्या प्रकोपापासून गाव सुरक्षित राहावा म्हणुन बहुतांशी महिला उपवास देखील करत असल्याची माहिती आहे.

कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत व अशा अनेक महामारीत बहुतांशी खेडेगावातील गावकरी जनता माराई मातेच्या ठिकाणी पूजा-अर्चा करून त्यांच्यावर विश्वास ठेवीत येणाऱ्या प्रकोपापासून आपल्या गाव वासियांचा बचाव होईल यासाठी पूजा अर्चा केली जाते मात्र सात दिवस कोणीही गावकरी व्यक्ती मास मटण खाणार नाही याची दखल घेतली जाते शिवाय गावातील ठेवलेल्या निर्णयाचे ग्रामस्थ पालन करतात जेव्हा जेव्हा सदर गावातील लोक माराई मातेचा धावा करतात तेव्हा तेव्हा माराई माता गावाच्या मदतीसाठी नक्की धावून येतात. असा विश्वास आजही अर्हेरनवरगाव, खरकाडा (रनमोचन), रुई गावासह इतर गावांना आहे.

गेल्या वर्षीपासून अगोदरच कोरोनाने देशासह राज्य आणि जिल्हे व तालुक्यातील अनेक गावात सुद्धा कोरोना सारख्या महामारी ने लोक हतबल झाले आहेत. ह्या महामारी पासून परिसरातील बहुतांशी गावे सुरक्षित राहावे व असे प्रकोप गाव़ावर येऊ नये अन कदाचित आलाच तर तो कायमचा गावातून नष्ट व्हावा ह्या उदांत हेतूने श्रद्धेचा भाग म्हणून पूजाअर्चा केली जात आहे.यामध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशाचे महिला मंडळीकडून सुद्धा योग्य पद्धतीने पालन करीत सुरक्षित अंतर ठेवले जाते आहे.

दिनांक 21 एप्रिल पासून लावण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला योग्य पद्धतीने प्रतिसाद दिला जात आहे.बॉक्समध्ये गेल्या अनेक काळापासून ही प्रथा अनेक खेड्यातील भागात प्रामुख्याने आढळून येते केवळ हा एक श्रद्धेचा भाग म्हणून कार्य केले जात असले तरी,मात्र आधुनिक युगात ही प्रथा दिवसांनगीक कमी होत चालली असून सुशिक्षित लोक महिला व युवक युवती अंधश्रद्धेचाच भाग म्हणून त्याकडे पाहतात अशा कार्यात त्यांचा सहभाग आढळून येत नाही इतके मात्र खरे!