राष्ट्रीय पेयजल ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना कामे मंजूर पालक मंत्र्याच्या प्रयत्नांना यश

25
✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.13मे):-तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जल जीवन मिशनच्या संयुक्त विद्यमाने जवळपास नळ योजनेची कामे पूर्ण केलेली असून केंद्र शासनाच्या धोरणानुसार हर घर में नल ते जल ह्या धोरणाचे पालन करून तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीं मध्ये शिल्लक असलेल्या कुटुंबांना नळ योजना जोडणीचे काम मंजूर करण्यात आले आहे.ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात जे हातपंप नादुरुस्त आहेत शिवाय जे नळ बाधित झालेले आहेत असे 15 कामे मंजूर करण्यात आलेले आहेत.

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या शीर्षका अंतर्गत 11 ग्रामपंचायतींना कामे मंजूर करण्यात आली आहेत मात्र ज्या ग्रामपंचायतीचे कामे मंजूर झाली आहेत त्यांनी त्वरित काम करून घ्यावे असे निर्देशही देण्यात आले आहे तर 21 गावांना जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या संयोगाचे काम मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे.यामध्ये मुख्यत्वे तळोधी (खुर्द) जुगनाळा गांगलवाडी वांद्रा माल डोंगरी येते पूरक वाढीव नळ योजनेचे काम मंजूर करण्यात आले.
असून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून एकंदरीत पिण्याच्या पाण्याच्या समस्या संदर्भात सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल पाणी पुरवठा विभागाच्या स्तरावरून सांगितले जात आहे संबंधित विभागां कडून चांगले कार्य होत असल्याने तालुक्यातील जनते मध्ये त्यांच्या स्तृत उपक्रमाचे समाधान व्यक्त केले जात आहे.
बॉक्समध्ये नळ योजनेमुळे मिळणार महिलांना दिलासा:
पाणी हा मानवी जीवनाला नवसंजीवनी देणारा जलस्त्रोत घटक असून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल पाणी पुरवठा योजनेतुन मुख्यत्वे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची उद्भवणाऱी समस्या आता मिटणार असल्याने महिलांची पाण्यासाठी होणारी अधिकची पायपीट आता थांबणार आहे वारंवार ग्रामीण स्तरावरून या मागणी संदर्भात पालक मंत्री यांना पत्र व्यवहार सुद्धा केला होता पाण्याची उद्भवणारी समस्या लक्षात घेऊन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश अखेर
जनतेकडून त्यांचे आभार व्यक्त होत आहेत.