ईद उत्साहाने साजरी करा पण घरात राहून -श्री.अंजुम इनामदार

29

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

पुणे(दि.13मे):- मुस्लिम बांधवांचा अति महत्त्वाचा मानला जाणारा रमजान ईद ईद-उल-फित्र दिनांक 14/5/2021 रोजी होणार आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजा ठेवतात व संपूर्ण महिना रोजा ठेवला नंतर ईद साजरी करतात.

दिनांक 14 मे 2021 रोजी होणाऱ्या या ईदच्या दिवशी तमाम मुस्लिम बांधवांना कडकडाची हात जोडून विनंती मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने करण्यात येते की.
पुणे शहरातील कोरोना या आजाराची परिस्थिती खूप गंभीर आहे. दररोज कोरोना या आजाराचे साधारण तीन हजार पेक्षा अधिक रुग्ण पुण्यात आढळून येत आहे.दररोज मरणार्‍या लोकांची संख्या ससून हॉस्पिटल वगळता साधारण 80 पेक्षा जास्त आहे व क्रिटिकल असलेल्या लोकांची संख्या साधारण चौदाशे पेक्षा जास्त आहे. आजही पुण्यात अनेक हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध नाही ऑक्सिजनची कमी आहे रेमडेसिविर इंजेक्शन ची मागणी मोठ्या प्रमाणात लोक करतात व प्लाजमा साठी विविध हॉस्पिटल व ल्याबमध्ये चक्कर मारत आहे .असे भयंकर चित्र पुण्यामध्ये निर्माण असताना मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा असणारा ईद-उल-फित्र रमजान ईद आली आहे.

सर्व मुस्लिम बांधवांनी समझदारीची भूमिका घेऊन संयमाने आपण राहत असलेल्या घरातच नमाज पठण करावे.नमाज नंतर अल्लाच्या चरणी विशेष दुवा करा कोरोना या आजाराने सर्वांना मुक्ती द्यावी. विशेष दुवा नमाज अदा केल्यानंतर घरात केलेल्या शीरखुर्मा,बिर्याणीचा स्वाद घ्यावा.सोशल डिस्टंसिंगचा काटेकोर पालन करा हस्तांदोलन व गले भेटण्या पासून दूर राहावा नातेवाईकांना व मित्रांना भेटण्यासाठी घरातून बाहेर पडू नये आपली सुरक्षा हेच आपले देशाची सुरक्षा पुणेकरांची सुरक्षा आहे. तुम्ही सुरक्षित राहावा आम्ही अल्लाह, ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आपण सुरक्षित राहिला तर दरवर्षी ईद साजरी करू.
म्हणून शासनाने दिलेल्या सर्व नियमाचा पालन करावे व पोलिसांना सहकार्य करावे.

अशी विनंती मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष श्री.अंजुम इनामदार यांच्या वतीने सर्व बांधवांना करण्यात येते.
अपेक्षा करतो कि आम्ही केलेल्या विनंतीला पण साथ ते देणार.