राणीसावरगाव येथे होणार १०० खाटांचे कोविड सेंटर

25

🔹 महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना. अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश.आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या प्रयत्नाला आले यश

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15मे):- विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास राज्यमंत्री मा.ना. अब्दुल सत्तार यांच्याकडे आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र राणीसावरगाव येथे १०० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती या बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्र्यांनी राणीसावरगाव येथे शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने ग्रामीण रूग्णांना तात्काळ उपचार घेता यावा व त्यांची हेळसांड होऊ नये याकरिता गंगाखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र राणीसावरगाव येथे १०० खाटांचे कोविड सेंटर सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार घेण्याकरिता तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या कारणाने रुग्णांची हेळसांड होऊन कोरोनाचा प्रसार होऊ लागला. रुग्णांना वेळेत औषध उपचार मिळाल्यास कोरोना महामारी च्या प्रसारास आळा बसावा यासाठी राणीसावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या इमारतीत रुग्णांना तात्काळ औषध उपचार देता येऊ शकतो. ग्राम विकास मंत्री परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राणीसावरगाव येथे शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्याची विनंती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पत्राद्वारे ग्राम विकास मंत्र्यांकडे केली होती.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना. अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र राणीसावरगाव येथे १०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्या संदर्भातचे महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. आमदार गुट्टे यांच्या प्रयत्नातून राणीसावरगाव येथे उभारण्यात येणाऱ्या १०० खाटांच्या सेंटरचा ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांना याचा निश्चित फायदा होईल व कोरोना प्रसारास आळा बसण्यास मदत होणार आहे.