काव्यातील नक्षञ ई मासिक प्रकाशन सोहळा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.15मे):-छञपती संभाजी महाराज जयंती निमित्त “काव्यातील नक्षञ” मासिकाच्या तेरावा अंकाचा
(१३ वा अंक) ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे तर्फे दर महिन्याला प्रकाशित होणारे हे डिजिटल ई-मासिक “काव्यातील नक्षञ” आहे. .कवींच्या हक्काचे…सन्मानाचे ,आदराचे व्यासपीठ नक्षञाचं देणं काव्यमंच होय.

यावेळी ग्रामगीता बंडोपंत बोढेकर म्हणाले,”नवनवीन संकल्पना घेऊन कामकरणारी महाराष्टातील एकमेव क्रियाशील संस्था आहे.समाजाच्याला जागृत करण्याचे काम कवी या माध्यमातुन करत आहे.आपल्या काव्यलेखनातून समाजातील संवेदनशिलता जपत आहे.कवींच्या काव्यसहली,काव्यमैफल,कवींचे कॅलेडर,कवितांचे प्रकाशन,महाकाव्यसंमेलने,विविध कार्यशाळा घेऊन कविंना लिहिते व बोलके करण्याचे न थकता न थांबता गेली २१ वर्षांपासुन करत आहे.संस्थेच्या कार्यात सर्व समाजातील घटकांनी जोडून हे कार्य पुढे चालू ठेवावे.भविष्यात कवींना काव्यक्षेञात आशेचा किरण आहे.”

प्रकाशक सोहळा शुभहस्ते संपन्न झाला.मा.ग्रामगीताचार्य श्री.बंडोपंत बोढेकर(चंद्रपूर)तसेचप्रकाशन सोहळा विशेष अतिथी शाहीर,कवी,प्राचार्य सतिश वाघमारे,प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे म्हणुन मा.कविवर्य संभाजी चौगुले(पन्हाळा ) मा.कविवर्य सुनिल बिराजदार-(सोलापूर )मा.कविवर्य राम जाधव बुलढाणा, मा.कविवर्य प्रकाश पाटील(जळगाव),मा.कविवर्य श्री शाहू संभाजी भारती सर (डहाणू),मा.कविवर्य शिवनाथ गायकवाड(कन्नड ),मा.कविवर्य शिरीष दडमल वरोरा,मा.कविवर्य धनंजय साळवी ( चंद्रपूर) कविवर्या सौ.मंजुषा कऊटकर- ( नागपूर) इ.मान्यवर आॅनलाईन उपस्थित होते.

छञपती संभाजी महाराज जयंती दिनी हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाचे आयोजन,
संयोजक-संपादक कवी वादळकार,पुणे व नक्षञाचं देणं काव्यमंच व नक्षञ परिवार यांनी केले.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED