अनिकेत अग्रवाल यांची युवा इंटकच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15मे):- गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांना हाताशी धरून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अनिकेत अग्रवाल यांची युवा इंटकच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती महाराष्ट्र इंटक प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी नियुक्ती पत्र देत केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनिकेत अग्रवाल यांना इंदिरा नगर मित्र परिवारा तर्फे शुभेच्छा दिल्या.पक्ष वाढीसाठी अग्रवाल हे युवकांना संघटीत करतील असा विश्वास वरिष्ठ पदाधिकारी यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED