प्राणवायू निर्मितीमध्ये जिल्ह्याला स्वंयपूर्ण करणार -पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

23

🔹कोविड समर्पित रुग्णालयातील प्राणवायू निर्मिती प्रकल्प कार्यान्वित

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.15मे):- कोरोनाने थैमान घातले असताना सक्रिय रुग्णांना प्राणवायू ची वाढती गरज भासू लागली. अशा परिस्थितीत अन्य जिल्ह्यांमधून प्राणवायू चा पुरवठा जिल्ह्याला होत होता. मात्र अनेकवेळा गरजेपेक्षा कमी प्राणवायू मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातच प्राणवायू निर्मिती करून जिल्ह्याचे याबाबत अन्य जिल्ह्यावरील परावलंबत्व संपुष्टात आणणे गरजेचे आहे. पुढील काळात जिल्ह्याला प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण करणार येऊन जिल्हा याबाबत स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज व्यक्त केला.
जिल्हयात प्राणवायू तुटवड्यावर निदान म्हणून प्राणवायू निर्मिती प्रकल्प पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात येत आहेत.

आज १५ मे रोजी येथील स्त्री रुग्णालय समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पलकमंत्री ना. डॉ. शिंगणे यांच्या हस्ते हवेतून प्राणवायू निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाची ओपचारिकता रद्द करत फक्त पाहणी करून सदर प्रकल्प कार्यान्वित झाला असल्याची घोषणा केली.

जिल्ह्याला दररोज जवळपास १६ मे.टन ऑक्सिजन लागतो. आता या प्रकल्पा व्दारे ८० जम्बो सिलींडर हवेतील ऑक्सिजन २४ तासात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता, थेट प्लांटपासून रुग्णांच्या बेडला ऑक्सिजन पाइपलाईन अटॅच करुन रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी प्राणवायु निर्मिती प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या कोरोना लाटेच्या शक्यतेमुळे राज्य स्वंयपूर्ण होत असतांना बुलडाणा जिल्हा देखील सर्वार्थाने स्वंयपूर्ण करणार असल्याचा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.यावेळी प्र. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, डॉ. वासेकर आदी उपस्थित होते.
****