पत्रकार व त्यांच्या परिवारास लसिकरणासाठी प्राधान्य द्या – खा. डॉ. भारती पवार

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.15मे):- कोरोना संक्रमानाची दाहकता बघता सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात नागरिकांना या गंभीर आजाराचा धोका कमी होण्यास मदत होईल .सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या कोरोना काळात जे पुढे येऊन आपले कर्तव्य निभावत आहे असे सर्व पत्रकार , इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांचे प्रतिनिधी त्यांचे कर्मचारी तसेच त्यांचा परिवार यांना प्राधान्याने लसीकरण दिले पाहजे.

कारण दिवसभर काम करत असतांना त्यांचा अनेकांशी संपर्क येत असतो .आणि त्यातूनच त्यांना संसर्गाची लागण होऊ शकते .आणि त्यांना जर लागण झाली तर त्यांचा परिवार पण संक्रमित होऊ शकतो म्हणून मानवीय हेतूच्या दृष्टीकोनातून सर्व पत्रकार तथा इलेक्ट्रॉनिक वाहिनीच्या पत्रकार ,कर्मचारी यांचेसह त्यांच्या परिवारास प्राधान्य क्रमाने लस देण्यात यावी. अशी मागणी खा. डॉ. भारती पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे पत्रा द्वारे केली आहे