राष्ट्रवादी काँग्रेस महिला सामाजिक न्याय विभाग गडचिरोली च्या वतिने महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध

🔸महिला जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रमिलाताई रामटेके यांचे नेतृत्व

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.15मे):-शहरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे सुलतानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताना जनतेला महागाईपासून मूक्तीचं,अछे दिन च स्वप्न दाखवल. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला. मात्र पेट्रोल-डिझेल,स्पयंपाकचा गॅस अश्या सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.

जीवनावश्क वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वतः वाटू लागलं आहे. यामुळेच अकार्यक्षमकेंद्र सरकारचा, वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर महिला सामाजिक न्याय विभाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.यावेळी गिता फाफनवाडे,र्किर्ती भांडेकर, कमला भांडेकर, छाया उमंरगुडांवार, गिता भुरसे ,निम्मी भांडेकर ई.महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.
गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED