मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आधार कोविड केअर सेंटरचे 16 में ला उदघाटन
✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.15मे):- स्व दयासागरजी महाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने सुरु होत असलेल्या आधार कोविड केअर सेंटरचे दि 16 मे 2021 रोजी दुपारी 4 वाजता माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते रुग्णार्पण होणार आहे .
प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे राज्य उपाध्यक्ष , माजी पालकमंत्री संजयजी कुटे साहेब , जिल्हाध्यक्ष ऍड आ आकाश जी फुंडकर साहेब , चैनसुखजी संचेती हे राहणार आहे .
चिखली येथील स्व राजाभाऊ बोन्द्रे नगरपालिका शाळेच्या नवीनतम भव्य व प्रशस्त वास्तूमध्ये आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने शासन व लोकसहभागातून आधार कोविड केअर सेंटर सुरू होत आहे . हे कोविड सेन्टर 50 + 20 खाटांचे असुन 20 खाटा ऑक्सिजनच्या असून 50 खाटा सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांसाठी असणार आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे पूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे . यासाठी लागणारी औषधे , तपासण्या , नाश्ता , जेवण सुद्धा मोफत देण्यात येणार आहे .
तसेच धाड येथे ही 50 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार असून धाड येथील कोविड रुग्णालयाचे काम अंतीम टप्प्यात असुन लवकरच धाड येथील कोविड सेन्टर रुग्णांच्या सेवेत रुजू होत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे . कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे . रुग्णांना दवाखान्यात बेड मिळत नाही. खाजगी दवाखान्यात पैसे देऊनही बेड उपलब्ध होत नाही . रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेडसाठी वणवण फिरत आहे . त्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांना काही प्रमाणात का होईना आ सौ श्वेताताई महाले यांच्या वतीने आधार देण्यासाठी चिखली शहरात 50 + 20 खाटांचे ” आधार ” कोविड रुग्णालय सुरू करुन त्यात मोफत उपचार देणार असल्याने रुग्ण व नातेवाईक यांना फार मोठा आधार मिळणार आहे.
औषधांसोबतच रुग्णांना दिलासा ही दिल्या जाईल… आ सौ श्वेताताई महाले पाटील कोरोना महामारीच्या या काळात सगळीकडे दवाखाने हाऊसफुल्ल झालेली आहेत . रुग्ण संख्या दररोज वाढत असुन बेड मिळत नाही , औषधी मिळत नाही . त्यामुळेच आधार कोविड रुग्णालय हे रुग्णांना खऱ्या अर्थाने रुग्णांवर मोफत उपचार , मोफत औषधी देऊन आधार तर देणारच आहे सोबतच दिलासा देऊन त्यांना पुरेपुर बरे करण्याचा प्रयत्न करणार आहे . माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणारा कार्यक्रम हा कोरोनाच्या शासकीय प्रोटोकॉल पाळून होणार आहे.
या कार्यक्रमासाठी केवळ परवानगी मिळालेल्या व्यक्तींशिवाय कुणालाही प्रवेश असणार नाही . सदर कार्यक्रम हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या https://www.facebook.com/devendra.fadnavis/ आणि आ सौ श्वेताताई महाले यांच्या
@shweta.mahale.patil फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात येणार आहे . त्यामुळे या कार्यक्रमा साठी गर्दी न करता फेसबुक लाईव्ह वरुनचा कार्यक्रम पहावा असे आवाहनही आ सौ श्वेताताई महाले यांनी केले आहे .
महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED