नाशिक अंबड येथे तडीपार गुंड पोलिसांनी केला जेरबंद

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.15मे):-गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपार कारवाई केलेली असताना शहरात वावर ठेवणाऱ्या तडीपार गुंड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या संशयित पाथर्डी फाटा भागात मिळून आला याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अक्षय उत्तम जाधव( 24 )राहणार साई दर्शन आपारमेंट दत्तनगर असे अटक केलेल्या तडीपार आचे नाव आहे अक्षय जाधव यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्‍यास जर पोलिसांनी सहा महिन्याच्या कालावधी साठी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केले.

होते मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती शुक्रवारी रात्री पाथर्डी फाटा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी सापळा लावला असता तो शिवाजी पुतळा भागात पोलिसांच्या जाळ्यात अडकला या प्रकरणी पोलिस कर्मचारी मुकेश गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहे

क्राईम खबर , महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED