खंडाळा येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून

24

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)मो:-7387878769

पुसद(दि.15मे):- येथील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सावरगांव गोरे, रामनगर मध्ये राहात असणाऱ्या कुमारी सुवर्णा अर्जुन चव्हाण वय वर्ष २१ हिच्या राहत्या घरीच म्हणजे सावरगांव गोरे, रामनगर येथे आरोपी आकाश श्रीराम आडे वय वर्षे २७ याने तरुणीच्या घरी कोणीच नाही,घरातील सर्व लोक लग्नाला गेलेले आहेत असे समजताच त्यांनि तिला न कळताच क्षणि त्याने तरुणीच्या घरात जाऊन तरूणीवर धारधार शस्त्राने सपासप वार करून तिचा निर्घृणपणे खून केला, व नंतर तेथुन तसाच जंगलामध्ये पसार झाला, सदर घटना ही आज सकाळी १० ते १० :३० च्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांना कळताच ते घटना स्थळी जाऊन त्यांनि आरोपीचा शोध घेणे सुरू केला परंतु पोलिसांना अदयाप हि आरोपी सापडलेला नसून आरोपीचा शोध जंगलामध्ये चालूच आहे. शोध करणाऱ्या अधिकाऱ्यापैकी ठाणेदार नीलेश निवृत्ती गोपाळ चावडीकर.पो,नि, रवींद्र विनायक मस्कर. पोलिस हवालदार अशोक तडसे. ना,पो,का,हनुमान गंगासागर. पोलीस हवालदार मधुकर पवार गणेश राठोड, सचिन मलाये. गजानन जाधव ईत्यादी पोलिसांचे पथंक हे जंगलामध्ये संध्याकाळी अंधारी रात्र झाली असतांना ही आरोपीचा शोध घेणे सुरु आहेत., ~~~~~~~~~~~~~~~~~~