लाँयन्स कल्ब द्वारे अन्नछञाचा रुग्णांना लाभ

27

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.16मे):-गेल्या तीन वर्षापासुन लाँयन्स क्लब खामगावच्यावतिने जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या सामान्य रुग्णालयात गावखेड्यातील तसेच ईतर तालुक्यातील रुग्णांना अन्नछत्र ऊपक्रमाच्या माध्यमातुन सकस पोषक जेवणाचे वितरण करण्यात येत आहे कु.संक्रुती चेतनजी टिबडेवाल,व श्याम गोकुलचंदजी खेर्डावाला यांचे वाढदिवसाच्या निमीत्याने अन्नदान आज सामान्य रुग्णालयात लाँयन्स अन्नछत्रालयात करण्यात आले.

यावेळी अन्नछत्राचे प्रणेते लाँयन्स क्लबचे पदाधिकारी याचा वाढदिवसही रुग्णालयातील रुग्णांना अन्नदान करुन कोरोनाचे नियम पाळुन करण्यात आला हे अन्नछत्र मागिल तिन वर्षापासुन अविरत सुनियोजित पद्धतीत सुरु आहे याचा लाभ अनेक गरजु रुग्णांना मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे यावेळी अभय अग्रवाल, मिलींद वडोदे, संजय ऊमरकर, अँड गणेश ईंगळे,सुरज अग्रवाल,ऊज्वल गोयंनका,प्रसाद सानंदा,सुशिल मंत्री,हिरालाल लोढाया,राजुसेठ खेर्डावाला आदी यावेळी ऊपस्थित होते