साप्ताहिक पुरोगामी संदेशला अष्टवर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा !!

46

🔹वाचकांच्या प्रतिक्रिया (भावना)🔹

प्रति,
श्रीमान नरेशजी निकुरे
मान.कार्यकारी संपादक,
साप्ताहिक ‘पुरोगामी संदेश’
दि.१८.०५.२०२१.

महाशय सप्रेम नमस्कार !
अष्टवर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा !!
मी माननीय संपादक महाशयांना शुभेच्छा संदेश देत असताना मला योग्य वाटणा-या काही सूचना केल्या आहेत.त्या आपल्या समोरही मांडत आहे.शक्य असेल तर अंमल व्हावे.
====================
आपण आठ वर्षापूर्वी लावलेल्या इवल्याशा रोपट्याने एक महान वृक्षाचे लक्ष्य समोर ठेवून नवव्या वर्षात पदार्पण करताना नजरेत भरणारी उंची गाठली आहे.आज सर्वच क्षेत्रात अख्खं जग अतिशय अटीतटीच्या स्पर्धेत धावत आहे. लहानपणी ऐकलेल्या ससा आणि कासव यांच्या स्पर्धेपासून सहसा कुणीच बोध घ्यायला तयार नाही. किंबहुना कुणाला वेळच नाही. प्रत्येकजण सशासारखे फाजील आत्मविश्वासाने धावतोय.परंतु ‘पुरोगामी संदेश’ची वाटचाल कासवगतीनेच राहू द्या.कारण आज दैनिकं आणि वेब पोर्टल ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची महत्वाची भूमिका पार न पाडता. व्यवसायाची आणि राजकीय पक्षांच्या प्रचाराची साधनं झाली आहेत.नफा-तोट्याचे गणित नाही जमले की,पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे गायब होऊन जातात.अशा स्थितीत साप्ताहिक पुरोगामी संदेशची वाटचाल पत्रकारितेच्या जगतात निश्चितच कौतुकास्पद आहे.जगाला वेठीस धरलेल्या कोरोना म्हातारीला रोखण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून भारतभर टाळेबंदी लावली गेली.

अशा कठीण प्रसंगातही ‘पुरोगामी संदेश’ने वाचकांची अविरत सेवा केली.कुठल्याही अफवा न पसरवतात अथवा अफवांना बळी न पडता. नियमितपणे सत्य वार्तांकन करण्याबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाची,अध्यात्माची,शिक्षण, साहित्य,कला, क्रीडा,आरोग्य राजकारण, समाजकारण अशा मानवी जीवनाच्या सर्वांगाला समान संधी देत आपण आज अष्टवर्षपूर्ती गाठली आहे.याबद्दल आपण संपादक,आपल्या सोबत असणारे कर्मचारी, वितरक आदी सर्वांचे मनापासून अभिनंदन ! भविष्यातही ‘पुरोगामी संदेश’ची प्रतिमा अधिकाधिक पारदर्शक आणि भरभराटीची जावो हीच मनोकामना.

जगात कुठलेही सोंग करता येईल परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही.प्रसार माध्यमांचे महत्व ओळखून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणारे,लेखक, कवी,जाहिरातदार,वाचक, हितचिंतक आदींनी पुरोगामी संदेशच्या पाठीशी आपलेपणाच्या भावना आणि निष्ठेने उभे राहणे आवश्यक आहे.आपणही वर उल्लेख केलेल्या सर्व संबंधितांना एक पुरोगामी परिवाराच्या भावनेने आजीव सभासद नोंदणी योजना सुरू करुन लेखक,कवी, वार्ताहर आणि सदस्य अशी विविध ओळखपत्रे देऊन सर्वांना पुरोगामी संदेश समुहात एकत्र करण्याची योजना आखली तर बराचसा निधी जमल्या येईल. त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देता येईल. तसेच वार्षिक वर्गणीदार ही देखील योजना सुरू करावी. म्हणजे निधीही जमवता येईल आणि एक समुहाचा आपलेपणाही जपता येईल.

माझ्या मनातील इच्छा/भावना मी आपल्यासमोर मांडल्या. पुन्हा एकदा अष्टवर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा ! पुरोगामी संदेशची लेखणी अविरत चालू राहून भरभराट व्हावी हीच मनोकामना !

✍️शुभेच्छुक:-विठ्ठलराव वठारे(उपाध्यक्ष,पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशन महाराष्ट्र)
joshaba1001@gmail.com