कडक लॉक डाऊन मध्ये शिथिलता द्या

20

🔸विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांची मागणी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.18मे):- वर्धा जिल्ह्यामध्ये महिन्याभरापासून कडक लॉक डाऊन आहे .दिनांक 8 मे पासून 13 मे पर्यंत कडक लॉक डाऊन जिल्हाधिकारी यांनी घोषित केले त्या वेळी अनेक गोरगरीब जनतेने आपली पाच दिवसाची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. परंतु त्यानंतर दिनांक 12 मे ला पुन्हा एक नविन आदेश काढून तेच कडक लॉक डाऊन पूर्ववत सुरू ठेवण्यात आले लोकांनी ते पुन्हा पाच दिवसाचे कडक लॉक डाऊन सहन केले. परंतु त्यानंतर 16 मेला एक नवीन आदेश निघाला व त्या आदेशामध्ये अशाच प्रकारचे कडक लॉक डावून सतत 1 जून पर्यंत राहील असे नमूद आहे.

अगोदरच सर्वसामान्य जनता लॉक डाउन ने त्रस्त झाली असताना व दहा दिवसाचे कडक लॉक डाऊन सहन केले असताना त्यानंतर पुन्हा 13 दिवसाचे कडक लॉक डाऊन हे जनतेच्या हिताचे नाही म्हणून हिंगणघाट शहरातील व्यापारी संघटनांचे अध्यक्ष, शहराचे नगराध्यक्ष , लोकप्रतिनिधी , कामगार प्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्त सभा घेऊन यावर काही तोडगा काढता येईल का ? याकरिता माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन तारीख व वेळ कळवावी असे निवेदन अनिल जवादे यांनी माननीय उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना दिलेले आहे