आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नाला यश

30

🔹मेहकर ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू होणार

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मेहकर(दि.19मे):- जागतिक कोरोना महामारीत आपल्या मेहकर-लोणार मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्य सेवा मध्ये कमी राहू नये तसेच ऑक्सिजन तुटवड्यावर निदान म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लाट आपले लोकप्रतिनिधी संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मेहकर येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये उभारण्यात येत आहेत.ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागामध्ये आढळतांना दिसत असून रुग्णांना ऑक्सिजनची अतोनात गरज असताना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही त्यामुळे खाजगी रुग्णालयात रुग्णांची आर्थिक पिळवणूक केल्या जाते किंबहुना आर्थिक परिस्थिती नसलेले नागरिक उपचाराकडे पाठ फिरवतात.
आपल्या तालुका स्तरावर रुग्णांची गैरसोय होणार नाही.

याची खबरदारी म्हणून आज 17 मे 2021 रोजी मेहकर ग्रामीण रुग्णालयात येथे आमदार संजय रायमुलकर, तहसीलदार संजय गरकल,शरद म्हस्के उपविभागीय अभियंता,गुलाब शेळके,वैद्यकीय अधिकारी डॉ शाम ठोबरे,राजु डोगरदीवे,रुपेश गनत्रा यांनी जागा निश्चित करुन उद्या पासुन ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या काम सुरू होऊन 15 दिवसामध्ये काम पुर्ण होईल.आपले मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे जनतेचे सरकार जनतेची सेवा करत आहे आणि करत राहणार आहे.माझा महाराष्ट्र व मतदारसंघ हा आत्मनिर्भर कृतीतून निर्माण होत आहे,असे बोलताना आ.संजय रायमुलकर म्हणाले.