राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा धनादेश अपघातग्रस्त विदयार्थ्याच्या पालकाला वितरीत

27

🔹ब्रम्हपुरी पं.स. सभापती रामलाल दोनाडकर यांच्या हस्ते वितरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.20मे):-सर्पदंश झाल्याने मृत पावलेल्या विदयार्थ्याच्या पालकाला राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदानातुन ७५ हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण ब्रम्हपुरी पंचायत समितीचे सभापती रामलाल दोनाडकर यांच्या हस्ते करण्यात आले.ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज येथील विपुल एकनाथ मेश्राम हा विदयार्थी जि. प. उच्च प्राथ. शाळेच्या वर्ग ७ वी मध्ये शिकत होता. २० आँक्टोंबर २०१९ मध्ये सदर विद्यार्थ्याचे सर्पदंशाने निधन झाले होते.

त्यानंतर चंद्रपूर जिल्हापरिषद कडे राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मृत विदयार्थ्याची आई सौ. शालु एकनाथ मेश्राम यांना ७५ हजार रुपयांचा धनादेश ब्रम्हपुरी पंचायत समीतीचे सभापती रामलाल दोनाडकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल चिलमवार, शिक्षण विस्तार अधिकारी माणिक खुणे, निलज येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता रासेकर, शा.व्य.समीती अध्यक्षा सौ. निताताई धोंगडे, उपाध्यक्ष अशोक भुते, शाळा व्यवस्थापन समीती सदस्य तथा पत्रकार राहुल मैंद हे उपस्थित होते.