निफाड नगरपंचायत हद्दीत कडक लॉक डाऊन पाळला जाण्यासाठी नगरपंचायत तिकडून अनेक उपाय योजना

27

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.21मे):- जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये निफाड नगरपंचायत अनेक उपाय योजनाहद्दीत देखील कडक लाॅक डाऊन पाळला जाण्यासाठी निफाड नगर पंचायती द्वारे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे नियमांची माहिती देखील अनाउन्समेंट द्वारे देण्यात आलेली आहे परंतु या उपर देखील काही दुकानदार व व्यावसायिक यांच्याकडून सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणे होम डिलिव्हरी व्यतिरिक्त गिर्‍हाईकाला समोरासमोर खरेदी देणे याबाबतचे प्रकार सुरू असल्याबाबत आज प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले. या मोहिमेअंतर्गत आज एकूण पाच दुकाने सील करण्यात आली.

एप्रिल महिन्यापासून ते आज दिनांक 20 तारखेपर्यंत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांनी विरुद्ध दंडात्मक कारवाई करून एकूण 18 हजार तेराशे रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे दुकानदार व व्यावसायिक सोशल डिस्टंसिंग मास्क सनी टायझर या नियमांचे पालन करत नव्हते अशांवर एकूण रक्कम रुपये 60 हजार 700 ची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्याच प्रमाणे आजपर्यंतच्या मोहिमेत एकूण आठ दुकाने सील करण्यात आलेली आहेत.