आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू जावेद चौधरी यांच्यातर्फे लोणार कोविड सेंटरला ऑक्सिजन मशिन भेट

23

✒️बुलढाणा प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

बुलढाणा(दि.21मे):-दिव्यांग शक्तीचा आवाज जगभर पोहचविणारे ईन्टरनँशनल खेळाडु जावेद चौधरी यांनी कोराना लाँकडाऊनच्या प्रसंगाला धाऊन येत आपली व आपल्या मित्र परिवाच्यामाध्यमातुन मग अन्नदान वा ईतर सहाय्य यासाठी पुढाकार घेत सुरक्षित जिवन जगविण्यासाठी केलेल्या कामाला त्यांनी प्रसीद्दीला दुर ठेवत कार्य सुरु ठेवले अगदी दिनदुबळ्याचा फोन मिळाल्यानंतर तत्काळ आगेकुच करत सरसावले लोणार येथे कॉन्सन्ट्रेटर,मास्क व सैनीटायझर सह भेट जावेद चौधरी व आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू यांनी मिळून एक मोहीम हाती घेतली त्यात लोणार covid सेंटर ला 10 लिटर प्रति मिनिट शमता असलेली ऑक्सिजन मशीन भेट दिली.

व कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे वेगवेगळ्या भागात लॉकडाऊन मध्ये गरजू परिवार ला 1 महिन्याची 1000 राशन किट वाटप केले व 1000 लोकांना घरपोच डब्बे पोहचविले आणि दिल्ली येथे 18 ऑक्सीजन सिलेंडर वारंवार रिफिल करून पुरविले तसेच लोणार covid सेंटर येथे ऑक्सीजन मशीन भेट दिली भेट देताना दिव्यांग खेळाडू जावेद चौधरी,covid सेंटर व्यवस्थापक डॉ, भास्कर मापारी, वैद्यकीय अधिकारी फिरोजशहा, तहसीलदार सैफानं नदाफ ,डॉ,पूजा सरकटे,अजय गायकवाड ,,अनुच केला,जुनेद चौधरी, अंकित बैरागी ,रहीम शेख उपस्थित होते