अर्हेरनवरगाव येथील आरोग्य अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू नका

24

🔹जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

🔸परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.22मे):-तालुक्यातील अर्हेरनवरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये अशी मागणी परिसरातील नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कडे कडे निवेदनाद्वारे केली आहे.अर्हेरनवरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.सौरभ लांजेवार व डॉ.जयश्री भोंगळे यांना कार्यमुक्त करण्यात आले असल्याचे परिसरातील नागरिकांना कळले .मात्र काही दिवसापासून येथील आरोग्य केंद्रात कोविड चे लसीकरण सुरू झाले होते.

व संपूर्ण परिसरात हे वैद्यकीय अधिकारी 24 तास उत्तम प्रकारे सेवा देत आहेत यांनी आपल्या वैद्यकीय सेवेबरोबरच,समाजसेवा करून कित्येकदा माणुसकीचे दर्शन घडवून परिसरात आदर्श निर्माण केले त्यांच्या अविरत सेवा आणि रुग्णांप्रति अपुलकीमुळे ते परिसरातील लोकांचे चांगलेच चाहते झाले यांना कार्यमुक्त केल्या जात आहेत असे कानावर पडताच नागरिकांच्या मनात प्रशासनाविरुद्ध आक्रोश निर्मन झाला असून परिसरातील नागरिक एल्गार पुकारण्याच्या मनस्थितीत आहेत.

मागील वर्षी पूर काळात सुद्धा या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुराचा तडाखा बसलेल्या शेकाळो लोकांना स्वखर्चातून भोजनाची व्यवस्था केली,कित्येकांचे घर पुरामुळे उध्वस्त झाले तेव्हा त्यांना राहण्यासाठी स्वतःचे क्वाटर दिले,गावातील तरुणांच्या हाताशी घेऊन ठिकठिकाणी आरोग्य कॅम्प राबविले,कोरोना परिस्थितीतही आशा कर्मचार्यांसोबत दारोदारी जाऊन रुग्ण तपासणी, कोरोना संदर्भात विचारपूस केली व उपचार केले असून ते हे सेवाकार्य अविरतपणे ते मागील दोन वर्षापासून करीत असून त्यांनी आरोग्य सेवेबरोबरच समाजसेवेने परिसरातील लोकांची मने जिंकली आहेत.

असे असतांना अचानक त्यांना कार्य मुक्त करणार असल्याचे माहिती होताच परिसरातील नागरिकांचा त्यांच्या कार्यामुक्ती ला तीव्र विरोध दर्शविला असून नागरिकांच्या आरोग्याचा व भावनांचा विचार करून सद्या कार्यरत असलेल्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करता त्यांना त्यांच्या पदावर कायम ठेऊन त्यांची सेवा पूर्ववत ठेवावी.यांच्या व्यतिरिक्त इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवत असाल तर सर्व गावकरी व परिसरातील नागरिक प्राथमिक आरोग्यकेंद्रासमोर आंदोलन करून कामकाज पूर्णतः ठप्प करू.उद्भवणाऱ्या परिस्थितीस आरोग्य विभाग व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा प्रा.आरोग्यकेंद्र अर्हेरनवरगाव अंतर्गत येणाऱ्या ग्रा.पं. अर्हेरनवरगाव,ग्रा.पं.नांदगाव,ग्रा.पं.भालेश्वर,ग्रा.पं.चांदली,ग्रा.पं.तोरगाव,ग्रा.पं.कन्हाळगाव,ग्रा.पं.कालेता,ग्रा.पं चिंचोली,ग्रा.पं. सावलगाव,ग्रा.पं. सोनेगाव यांच्या कडून जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनातून करण्यात आला.

सदर निवेदनाच्या प्रती संवर्ग विकास अधिकारी ब्रम्हपुरी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर,जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आला असून यावेळी चंद्रपूर जि.प.चे माजी उपाध्यक्ष क्रीष्णाजी सहारे,जि.प.सदस्य स्मिताताई पारधी,ब्रम्हपुरी पंचायत समितीचे माजी सभापती विलास उरकुडे,अर्हेरनवरगाव चे सरपंच सौ.दामिनी चौधरी,भालेश्वर चे उपसरपंच शरद भागडकर,पिंपळगावचे सरपंच सुरेश दुणेदार,नांदगाव चे सरपंच प्रवीण बांडे,चांदलीचे सरपंच संदीप बागमरे,कलेता येथील सरपंच राकेश पिलारे,चिंचोली चे सरपंच गजानन ढोरे,सावळगाव येथील सरपंच श्रीमती परचाके,तोरगाव येथील सरपंच संजय राऊत,मुकेश उरकुडे,रुजू शिलार,दयाराम साखरे,अशोक मदनकर, रवी जिभकाटे,मयूर मदनकर व ग्रामपंचायत सदस्य तथा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.