चंद्रपूर जिल्ह्यात (दि.22मे) रोजी 24 तासात 1071 कोरोनामुक्त, 377 कोरोना पॉझिटिव्ह तर 17 कोरोना बधितांचा मृत्यू

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22मे):- जिल्ह्यात मागील 24 तासात 1071 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 377 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 17 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 80 हजार 600 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 72 हजार 998 झाली आहे. सध्या
6 हजार 246 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 53 हजार 98 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 69 हजार 881 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 42 वर्षीय महिला, घुटकाळा वार्ड येथील 54 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 38 वर्षीय पुरुष, पंचशील चौक परिसरातील 60 वर्षीय महिला, पठाणपुरा वार्ड परिसरातील 52 वर्षीय महिला, नेहरू नगर परिसरातील 55 वर्षीय पुरुष, यशवंत नगर परिसरातील 50 वर्षीय महिला.बल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड येथील 68 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष.
राजुरा तालुक्यातील सोनुर्ली येथील 50 वर्षीय पुरुष.
भद्रावती तालुक्यातील शेगाव येथील 47 वर्षीय महिला, 54 वर्षीय पुरुष. कढोली येथील 65 वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष तर तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1356 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1257, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 45, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 377 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 103, चंद्रपूर तालुका 26, बल्लारपूर 49, भद्रावती 33, ब्रम्हपुरी 23, नागभिड 12, सिंदेवाही 14, मूल 08, सावली 06, पोंभूर्णा 05, गोंडपिपरी 06, राजूरा 28, चिमूर 09, वरोरा 17, कोरपना 28, जिवती 08 व इतर ठिकाणच्या 02 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 260 कोरोनामुक्त, 13 मृत्यूसह 180 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.22मे):- आज जिल्हयात 180 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 260 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28542 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26017 वर पोहचली. तसेच सद्या 1842 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 683 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 13 नवीन मृत्यूमध्ये 43 वर्षीय पुरुष जाफराबाद ता. सिंरोचा, 48 वर्षीय पुरुष घोट ता. चामोर्शी, 45 वर्षीय पुरुष मुर्झा ता.गडचिरोली,60 वर्षीय पुरुष ता. ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर, 39 वर्षीय पुरुष लगाम ता. मुलचेरा, 53 वर्षीय महिला आरमोरी , 65 वर्षीय महिला इंदीरा नगर गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष चींनगाव ता. कुरखेडा , 32 वर्षीय पुरुष विठ्ठलपुर ता. चामोर्शी, 62 वर्षीय महिला कोरेगाव ता. वडसा, 62 वर्षीय महिला कोतुर ता.अहेरी ,40 वर्षीय पुरुष सोनसरी ता. कुरखेडा, 55 वर्षीय महिला गोविंदपुर ता. मुलचेरा याचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.15 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 6.45 टक्के तर मृत्यू दर 2.39 टक्के झाला.

नवीन 180 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 41, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी 14, भामरागड तालुक्यातील 08, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 08, एटापल्ली तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 7, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 21, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 31 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 04 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 260 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 72, अहेरी 14, आरमोरी 14, भामरागड 04, चामोर्शी 52, धानोरा 19, एटापल्ली11, मुलचेरा 17, सिरोंचा 16, कोरची 07, कुरखेडा 14 तसेच वडसा येथील 20 जणांचा समावेश आहे.