आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेल्या शिक्षकाचे समुपदेशन करण्यात यश

21

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23मे):-संस्थाचालक आणि शिक्षण विभागाने मिलीभगत करून 15 वर्षापासून पगारा पासून वंचित ठेवलेल्या एका शिक्षकाने आत्महत्या करणार असल्याची पोष्ट सोशल मीडियाद्वारे केली होती. सदर पोस्ट गांभीर्याने घेत सखाराम बोबडे पडेगावकर यांनी त्या शिक्षकासोबत मोबाइलद्वारे संपर्क साधून समुपदेशन केले. गोपीनाथ गलांडे असे या शिक्षकाचे नाव आहे .ते मागील पंधरा वर्षापासून श्री स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय पळसगाव ता. वसमत जिल्हा हिंगोली येथे शिक्षक म्हणून काम करतात.

संस्थाचालक राघवेंद्र जोशी आणि जिल्हा शिक्षण अधिकारी परसराम पावशे मिलीभगत करून या ना त्या कारणाने गोपीनाथ गलांडे यांना आजपर्यंत पगारापासून वंचित ठेवले. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शिक्षकाने शेवटी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट समाज माध्यमात केली. समाज माध्यमावरील ही माहिती धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळताच त्यांनी गलांडे यांचा नंबर शोधून त्यांच्याशी संपर्क साधला. व त्यांची व्यवस्थित समुपदेशन केले. यासोबतच संस्थाचालक , शिक्षण विभाग यांच्याशी संपर्क साधून त्यांना लवकरात लवकर सेवेत रुजू करून घेऊन त्यांचा आजपर्यंतचा पगार काढण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.