सातारा जिल्हा बँकेकडून ‘म्हसवडकर कोविडं सेंटर’ ला 3 लाख किमतीचे व्हेंटिलेटर मशीन भेट- संचालक अनिल देसाई

20

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.24मे):-कोरोना महामारीच्या काळात कोरोना वायरसने सख्खा नात्यात दुरावा आणला, बााधीत झाल्यावर घरातील मंडळी बोलायचं सोडा संपर्क हि करत नाहीत,बाधीत नातेवाईकाचा मृत्यु झाल्यावर मयताचे तोंड हि पाहण्यास सख्खा भाऊ जात नाही या अशा परिस्थितीत हि स्वताच्या जिवाची पर्वा न करता आम्ही म्हसवडकर ग्रुपचे तरुण कोरोनाला न घाबरता कोरोना बाधीतावर चांगले उपचार व्हावे व त्या बाधीत माणसासाठी लोकवर्गाणीच्या माध्यमातुन लोकसहभागातुन १६ बेडचे आॅक्शीजन असलेले कोव्हीड सेन्टर उभेकरुन शेकडो बाधीतांचे जिवनदाते बनलेल्या आम्ही म्हसवडकर ग्रुपचे कार्य कौतुकास्पद असुन सातारा जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रातील एकमेव हे कोव्हीड सेंटर सलग १० महिणे सुरु आसुन लोकसहभागातील लोकवर्गणीतून म्हसवडकरांनी हे कोव्हीड सेन्टर सुरु केले.

या सेंटरला शासकीय मान्यता होती मात्र अॅनलाईन मान्यते पासुन औषध साठा, कर्मचारी वर्ग, अॅम्बुलन्स, आॅक्शीजन सिलेंडर उपलब्ध करुण दिले आज जिल्हा बॅकेच्या मदतीने जिल्ह्यातील पहिले मिनी व्हेन्टिलेटर असलेले बाॅयपॅप हे मशिन या आम्ही म्हसवडकर कोव्हीड सेन्टरला देवून भविष्यात कोरोनाची येणारी तिसऱ्या लाटेत म्हसवडकरांना कोणती ही अडचण येवू देणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅकेचे संचालक व युवानेते अनिलभाऊ देसाई यांनी सांगीतले
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून व जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून साधारण तीन लाख रुपये किमतीचे जिल्ह्यातील पहिले ‘बायपॅप मशीन म्हसवड DCHC ला देण्यात आले.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, व्यवस्थापक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक मा.जयवंत पवार,नोडल ऑफिसर डॉ.राजेंद्र मोडासे, विभागीय अधिकारी भाऊसाहेब शिंगाडे,आम्ही म्हसवडकर ग्रुपचे सदस्य युवराज सुर्यवंशी, कैलास भोरे,एल.के.सरतापे, राहुल मंगरुळे, प्रशांत दोशी, खंडेराव सावंत,संजय टाकणे,प्रितम तिवाटणे, डॉ.राजेश शहा, डॉ.गावडे, डॉ.शेळके मॅडम, डॉ.सावंत, डॉ.मुल्ला मॅडम,गणेश माने,सुहास भिवरे, अविनाश मासाळ,धनाजी भोसले शंकर पानसांडे, धनंजय पानसांडे आदी उपस्थित होते.

देसाई म्हणाले पाॅजिटिव रुग्णांचे जिव वाचवण्यासाठी दिवसरात्र झपाटल्यासारखे कोरोनाची भिती न बाळगता म्हसवडकर टिम काम करते आहे नव्हे रुग्णाचे पैसे वाचवण्यासाठी सेंटर मधील शासकीय औषधा बरोबर बाहेरील मेडिकल मधील महागडी औषधे वाजवी दरात ना नफा न तोटा या तत्वावर बाधीत रुग्णांना दिली जातात, पन्नास टक्के दराने लॅबची तपासणी , या कोव्हीड सेंटर मधील अॅडमिट रुग्णांला सीटीस्कॅन रिपोर्ट सवलतीच्या दरात देवून प्रत्येक रुग्णाचे लाखो रुपये वाचवून बाहेरील हाॅस्पिटल मध्ये जाणारे तिन ते साडे तिन कोटी म्हसवड व परिसरासह माण खटाव तालुक्यात शेतकरी, सामान्य नागरिकांचे वाचवून हे सेंटर एकप्रकारे बाधीतांना जिवनदायी ठरत आहे.

या सेंटरचा रिझल्ट माण मध्येच नाही तर खटाव ,माळशिरस ,आटपाडी तालुक्यात चांगला आहे येथील डाॅक्टर रोहण मोडासे व डॉ प्रमोद गावडे अनेकांचे जिवनदाते झाले आहेत पुढे देसाई म्हणाले गेल्यावर्षी सप्टेंबर पासुन म्हसवड मधील या होतकरू सामाजिक बांधिलकीची जाण असलेल्या तरूणांनी लोकसहभागातून पहिले कोविड सेंटर उभारून सर्वसामान्य कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे सद्याच्या कोरोनाच्या महाभंयकर दुस-या लाटेत या ग्रुपने दानशुर व्यक्तीच्या मदतीने अनेक रूग्णांचे प्राण वाचवले तर सामान्य गोरगरीबांना या कोविड सेंटरवर मोफत औषधासह मोफत उपचार करून ठणठणीत बरे केल्याची वस्तुस्थिती दिसुन येते या म्हसवडकर ग्रुपने सुरू केलेल्या कोविड सेंटरसाठी जी जी मदत लागेल ती मी माझ्या देसाई कुटूंब व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या यांच्या प्रयत्नातून जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

आम्ही या महामारीवर मात करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बैकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एक कोटी रूपये मदत दिली होती त्यानंतर दिड कोटी किमतीच्या बायपॅप मशीन जिल्ह्यातील कोविड सेंटरला देतो आहे संभाव्य दुस-या लाटेेचा सामना करण्यासाठी येत्या काळात म्हसवडकर ग्रुपला जी मदत लागेल ती देणार असल्याचे देसाई म्हणाले
यावेळी बोलताना म्हसवडकर ग्रुपचे युवराज सुर्यवंशी म्हणाले हे सेंटर उभे करताना ना जात ना धर्म ना कोणता हि राजकीय पक्ष आम्ही पाळला नाही कोणतेही मतभेद कोणताही स्वार्थ मनात न ठेवता केवळ माणुस जगवण्यासाठी व जनसेवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या सदस्यानी हे लोकसहभागातून हे कोविड सेंटर उभारले असुन अनेक दानशुर व्यक्तीनी आम्हाला सढळ हाताने मदत केली असुन त्या दानशुर व्यक्तीच्या सहकार्यानेच आजपर्यंत गंभीर रुग्णांवर मोफत व चांगले उपचार होऊन ते बरे होऊन पुन्हा ते आपापल्या कुटूंबात गेल्याने आनंद होतो आहे पहिल्या लाटे पेक्षा सध्याची दुसरी लाट तरुणांबरोबर वयोवृद्ध व्यक्तीला कोरोना आपल्यातुन घेऊन गेला तर यातुन सावरतोय तो पर्यंत लहान मुलांच्या तिसऱ्या लाटेची आम्ही म्हसवडकर करणार असुन नागरीकांनी भिऊन न जाता प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन संसर्ग वाढवणार नाही यासाठी मास्टर, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स महत्त्वाचा भाग आहे सहकार्य करण्याचे आवाहन सुर्यवंशी यांनी केले.
येणा-या कोरोनाच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बैंकेच्या माध्यमातुन आम्ही रूग्णांचा आरोग्य विमा उतरवणार असुन त्यात दिड लाखापर्यंतच्या कोरोना सह गंभीर आजारांचा समावेश असुन हा पुर्णपणे कैशलेस विमा असणार आहे जेणेकरून सामान्य व गोरगरिबांना पेशंट अैडमिट करण्यासाठी डिपॉजीट साठी मानसिक त्रास होणार नाही.