तालुक्यातील सर्वच दुकाने 7 ते 11 या वेळेत सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी

25

🔹व्यापारी संघटनेचे आ.कीर्तिकुमार भांगड़िया यांचे मार्फ़त मुख्यमंत्रताना निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.24मे):-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाने 5 एप्रिल पासून निर्बंधासाहित लॉक डाऊन घोषित केल्यामुळे सर्वसामान्य जीवनाशक व अत्यावश्यक सेवतील दुकाने सोडून सर्व दुकानदार अनेक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत, दुकाने बंद असले तरी त्याला दुकानात भरलेल्या सामानाचे देणे, बँकेचे व्याज, किराया, लाइट बिल, कामगार पगार, मुलानाच्या शिक्षणाचा खर्च , घरखर्च व इतर खर्च चालूच आहे, त्यामुळे आर्थिक स्थिति डबघाईस आली आहे,

शासनाने घोषित केलेल्या जनता कर्फ्यू मधे प्रशासनास वेळोवेळी व्यापारी यांनी सहकार्य करुन कोविड़चा संसर्ग दर कमी करण्यात मोलाचे सहकार्य केले आहे, सध्याच्या परिस्थितीत कोविड़चा संसर्ग दर कमी झाला असून लसिकरणाचा वेग वाढऊन सुधा शासन पुन्हा लोकड़ाऊँन करण्याच्या तयारित आहे, अनेक लहान मोठे व्यावसायिक देशोधड़ीला लागले आहेत.

त्यामुळे सर्वच दुकाने 7 ते 11 या मर्यादित वेळेत सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी संघटना चिमूर च्या वतीने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगड़िया यांचे मार्फ़त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कड़े निवेदनात केली आहे,निवेदन देते वेळी चिमूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, माजी अध्यक्ष प्रमोद बारापात्रे, संघटनेचे सचिव बबन बनसोड, प्रशांत जोशी, राजू बालदुआ, श्रीहरी सातपुते, संजय कुंभारे, गोलू शेख, उपस्थित होते