नाशिक त्रिरश्मी बुद्ध लेणीं समुहात दोनशे वर्षांनंतर आता नवीन 2 लेणींची भर

18

🔸साफसफाई सुरू असताना मिळाल्या दोन प्राचीन बुद्ध लेणी

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.24मे):-नाशिक येथील त्रिरश्मी बुद्ध लेणींसमुहात साफसफाई करत असताना अजून दोन प्राचीन लेणी सापडल्याने येथील लेणींमध्ये अजून भर पडली आहे,याअगोदर १८२३ साली कप्तान जेम्स डेलामीन या ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्याने सर्वात पहिल्यांदा नाशिक येथील ” त्रिरश्मी बुद्ध लेणीं”चे documentation केले आणि जगासमोर ही बुद्धलेणीं प्रकाशित केली.गेल्या दोनशे वर्षांत असंख्य इतिहास संशोधक, पुरातत्त्वविषद, अभ्यासक आणि पर्यटक ही बुद्धलेणीं पाहून गेले, अभ्यासून गेले. अनेकांनी यावर PhD केली. आज 200 वर्षांनी, बुद्ध पौर्णिमेच्या एक आठवडा आधी, या त्रिरश्मी बुद्ध लेणीं समूहातील आणखीन तीन भिक्खू निवासगृहांचा शोध लागला आहे.

गेल्या आठवड्यात, येथील नवीन रुजू झालेल्या Conservation Archaeologist राकेश शेंडे यांच्याबरोबर अतुल भोसेकर, सुनील खरे यांनी येथील लेणींच्या बाबतीत संवर्धन आणि जतन करण्या संदर्भात चर्चा केली. त्यावेळेस लेणींच्या वर, डोंगरात असलेली नाली साफ करून लेणीच्या आतमध्ये पडणारे पाणी थांबविण्यासाठी ती साफ करावी ही प्राथमिक गरज आहे हे सांगितल्यावर, शेंडे सरांनी कर्मचाऱ्यांना सूचना देत साफसफाई साठी लगेच सुरुवात केली.

त्यावेळेस नाली साफ करताना, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या कर्मचारि सलिम दगु पटेल यांना झाडाझुडुपांमध्ये लेणी असल्याचा अंदाज आला त्यांनी तेथे असलेले झाडे झुडपे बाजूला सारत आपले सहकारी कर्मचारी निवृत्ती शेरकर , करन पाल , निर्जय कुमार , दुपचंग तमांग , विक्की कुमार , अखिलेंद्र सिंह , नरेद्र जाधव,दिपक महाजन , भरत पाटिल , सुभाष जुंदारे , राहुल झनकर , सुधिर महाजन ,विजय टाक यांना सोबत नेऊन बघितले असताना त्यांना एका घळीत, झाडांनी वेढलेले दोन लेणी समूह व तीन भिक्खू निवासगृह दिसले. त्यांनी पुरातत्व विभागाचे राकेश शेंडे सरांना कळवले. बातमी कळताच ट्रिबिल्स संस्थेचे अतुल भोसेकर, व एमबीसिपीआर टीमचे सुनील खरे आणि पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर तेथे पोहचले व या भिक्खू निवासगृहांचा पाहणी केली.

अतिशय बिकट वाटेने, नुकत्याच झालेल्या घसरड्या डोंगराच्या उतारावरच्या मार्गावर, या दोन लेणीं कोरलेल्या दिसल्या. पुरातत्वीय निकषानुसार हे दोन्ही भिक्खूनिवासगृह इ.स.दुसऱ्या शतकातील असावीत. एका भिक्खू निवासगृहात दोन भिक्खू राहत असावेत तर दुसऱ्यात एकच भिक्खू राहत असावा असे लेणींच्या रचनेवरून दिसते. दोन्ही लेणींमध्ये व्हरांडा आहे.
या दोन्ही लेणींचे documentation मैत्रेयी भोसेकर आणि सुनील खरे यांनी केले असून लवकरच ते पुरातत्व विभागाला सोपविण्यात येईल. यात भिक्खुंसाठी वैशिष्ट्यपूर्ण दगडी चौथरा कोरला आहे तसेच ध्यान करण्यासाठी एक कोढी कोरण्यात आली आहे. ध्यान करण्यासाठी विशेष व्यवस्था कान्हेरी आणि वाई येथील बुद्ध लेणींत पाहायला मिळते.
या डोंगरावर अजूनही लेणी सापडू शकतात MBCPR team लवकरच यावर संशोधन मोहीम राबवणार आहे,
बुद्ध पौर्णिमेच्या एक आठवडा आधी सापडलेले हे भिक्खूनिवासगृह लेणीं येणाऱ्या काळातील सुवार्ताचे लक्षण आहे एवढे निश्चित