स्व: राजीवजी सातव यांच्या रूपाने कुशल संघटक व दूरदृष्टी ठेवणारा नेता हरपला-आमदार राजेश एकडे

22

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मलकापूर(दि.25मे):- विधानसभा मतदार संघ तसेच तालुका व शहर काँग्रेस कमिटी नांदुरा यांच्या वतीने स्व.राजीवजी सातव यांच्या अस्थी-कलश दर्शन तसेच मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्व.अनिल खाकरे पाटील व सिदखेड राजा तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष स्व.जगन ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.स्व.राजीवजी सातव यांच्या रूपाने कुशल संघटक व दूरदृष्टी ठेवणारा नेता गेल्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे अशी भावना यावेळी आमदार राजेशजी एकडे यांनी व्यक्त केली.

स्व.राजीवजी सातव यांच्या अस्थी-कलश दर्शन घेण्यासाठी तसेच मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्व.अनिल खाकरे पाटील व सिदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष स्व.जगन ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील,बुलडाणा जिल्हा काँगेस ओबीसी सेल चे अध्यक्ष श्री.गजानन खरात,बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,नांदुरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.गौरव पाटील,महाराष्ट्र सोशल मीडियाच्या सचिव सौ.सुनीताताई देशमुख,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे,मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.बंटी पाटील,मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील,नांदुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर डामरे,नांदुरा शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रध्दाताई गावंडे,श्री.श्रीकृष्ण खडसे,श्री.अशोक पाटील,श्री.प्रमोद गायकवाड,श्री.आकाश वतपाळ,अँड.मोहतेशाम रजा,श्री.अतुल पाटील,श्री.निवृत्ती,श्री.जयप्रसाद राजपूत,हिंगणकर,श्री,नारायण झाल्टे,श्री.शंकर बोबडे,श्री.कैलास नामगे,श्री.निवृत्ती वक्ते,श्री.सोपान गावंडे,श्री.गणेश पाटील,श्री.सुनील वेरुळकर,ईकबल खान,श्री.नामदेव मानकर,श्री.विजय डवंगे,श्री.विजय वासतकार,श्री.सुपडा धोटे,श्री.अशोक शेजोळे,श्री.भीमराव गवई प्रामुख्याने उपस्थित होते..