पुसद तहसीलमध्ये शिधापत्रीकात सावळा गोधंळ,बनावट बनवुन देणाऱ्या विक्रम मोटे वर 420 चा गुन्हा दाखल

25

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)मो:-7387878769

पुसद(दि.27मे):- तहसीलच्या परिसरात व महसुल विभागात बऱ्याच दिवसा पासुन शिधापत्रीकेत सावळा गोधंळ सुरू आहे,या प्रकरणात तहसील विभागातील कर्मचारी सहभागी असु शकते,आणी मेन सुत्रधार कोण असु शकते,समजुन घ्या,,?अर्ध्य तुम्ही आणी अर्ध्य आम्ही असा प्रकार खुप दिवसापासुनच सुरू आहे,वास्तविक पहाता गरंजु नागरीकांना शिधा पत्रीका करिता दोन दोन वर्ष तहसीलच्या आवती-भोवती चकरावर चकरा मारावे लागतात,आणी त्यात शिधा पत्रीका मिळविण्यासाठी दोन,तिन हजार रुपये मोजुन द्यावे लागतात अशी परिस्थीती असताना देखील गरीबांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.

गरीब जर व्यक्ती तहसील परिसरात दिसला की हे भामटे दलाल त्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवुन बनावट कामे करतात कारण आजचे प्रकरण पुसद तालुक्यातील पार्डी या गावातील सात नागरीक हे शिधापत्रीका बनविण्या साठी आले होते व त्याच वेळी हाच विक्रम श्रीराम मोटे यांनी त्या नागरीकांना बोलावुन मीच शिधापत्रीका बनवुन देतो म्हणुन सात लोकांन कडुन प्रत्येकी 1000 रु असे 13000 हजार रूपये घेऊन बनावट शिधापत्रीका बनवुन दिल्या असल्याचे समजले पंरतु त्या शिधा पत्रीकेवरील सिरेल नंबर जुळते मिळते न आल्यामुळे अन्नपुरवठा निरीक्षक यांनी वंसतनगर पो,स्टे,ला तत्काळ फीर्याद नोदवीली व दिलेल्या फिर्यादी वरुन विक्रम श्रीराम मोटे विरुध्द 420 चा गुन्हा दारवल केला आहे,पुढील तपास अंतीम तृतास असावा,,? ~~~~~~~~~~~~~~~~~~