ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला सुदृढ करण्यासाठी मी कटिबद्ध – जि. प. अध्यक्षा शिवकन्या शिरसाट

25

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई प्रतीनीधी)मो:-9763463407

आंबेजोगाई(दि.30मे):-पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेला मजबूत करण्यासाठी आज दिनांक 29 रोजी बीड जिल्ह्यात आठ रुग्णवाहिकेचे वाटप करण्यात आले असून घाटनांदुर येथे जिप अध्यक्षा शिवकन्या शिरसाट यांच्या प्रयत्नातून एक रुग्णवाहिका घाटनांदुर प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळवून दिली आहे. आंबेजोगाई तालुका घाटनांदुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते शिवाजी शिरसाठ परळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष गोविंद देशमुख प सदस्य मच्छिंद्र वालेकर, युवा नेते ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, बन्सीधर जाधव, ग्रा. प. सदस्य राजू शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी बालासाहेब लोमटे, घाटनांदुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डॉक्टर विलास घोळवे, शेख मेहबूब यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
पुढे बोलताना जि. प. अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ म्हणाल्या की बीड जिल्ह्यातील 25 आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा रुग्णवाहिकेचे उपलब्धता करण्यात येणार असून आज घाटनांदुर येथे संपन्न झालेल्या लोकार्पण सोहळ्यात आपण या भागातील जनतेला दिलेल्या वचनाची परिपूर्ती केल्याने मोठे समाधान वाटले आहे.

कोरोनाचे संकट पाहता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची नितांत गरज भासत होती, म्हणून आम्ही प्रचंड प्रयत्नातून एक रूग्णवाहीका ती प्राप्त केली आहे. त्याच बरोबर घाटनांदुर येथील कोविड केअर सेंटर उभारण्यात आले त्यामुळे गावातील सर्व पुढाऱ्यांचे अभिनंदन केले. या महामारी च्या काळात ज्या ज्या लोकांनी जीवाची तमा न बाळगता स्वतःला झोकून कार्य केले अशा सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनापासुन कौतुक करते. अत्याधुनिक रुग्णवाहिका प्राप्त झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होताना दिसत आहे.