भा.ज.प व्यापारी आघाडी तर्फे सेवाकार्य

22

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30मे):-केंद्रात श्री नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारचे 7 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सर्वांना आनंद होत आहे परंतु कोरोना च प्रादुर्भाव लक्षात घेता ह्यावर्षी कुठलाही आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी जनते च्या सेवेत संपुर्ण देशभरात विविध सेवाप्रकल्प राबविले जात आहे

याच अनुषंगाने पुसद शहरात व्यवसायकरिता येणाऱ्या ग्रामीण भागातले लहान व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडीवाले फुटपाथवर तसेच रस्त्याच्या बाजुला भर उन्हात कष्ट करून आपलं उदरनिर्वहन करणाऱ्या अनेक गरजु व्यावसायिक बांधवांना मदतीची सावली म्हणुन *भा.ज.पा व्यापारी आघाडी मार्फत जिल्हाध्यक्ष श्री रविजी ग्यानचंदानी यांच्या नेतृत्वात* या कष्टकरु बांधवांना उन्हाचा आणि पावसाचा त्रास होणार नाही या उद्देशाने त्यांना रविवार दि ३०/०५/२१ रोजी *छत्री (स्टँड सह)* वाटप करण्यात आले

या सेवाभावी कार्यक्रमाकरिता रविजी ग्यानचंदानी, विश्वासजी भवरे,धनंजयजी अत्रे, दिपकजी परिहार, महेशजी नाईक, सूर्यकांतजी पोराजवार , संदीपजी जिल्हेवार,भारतजी पाटील, प्रवीरजी व्यवहारे, विजयजी पुरोहित, पांडुरंगजी उतळे, राजुभाऊ जगताप, अतिषजी धोबे, ओमप्रकाश शिंदे, सुरज गंगवानी, हितेश कामदार, प्रतीक पाटील, सुरेश तिवारी , निलेश सिंहस्थे, प्रशांत नागरे, गजानन नमीले आणि भाजपचे बरेच सन्माननीय सदस्य उपस्थित होते