पदोन्नतीमधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय व असंवैधानिक निर्णय त्वरित मागे घ्या-रिपाई (आठवले)उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांची राज्य सरकारकडे मागणी

26

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.1जून):-नाशिकरोड येथे आज मंगळवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने व पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या C.M.O कार्यालय नाशिक विभाग यांची भेट घेऊन वरील विषयान्वये निवेदन दिले.

निवेदनाचा आशय असा आहे की महाराष्ट्र शासनाचा ७ मे २०२१ चा शासन निर्णय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय असंवैधानिक व बेकायदेशीर असल्यामुळे तात्काळ कायदा रद्द करण्यात यावा महाराष्ट्र शासनाने विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करतांना दि.३०/१०/२०१७ रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी मा. सर्वोच्च न्यायालयाने मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती दिली नाही म्हणून मागासवर्गीय ३३/पदोन्नती देता येणार नाही अशी भुमिका घेणे चुकीचे आहे मुळात स्थगिती देण्यात यावी अशी मागणीच त्यावेळच्या सरकारने केली नव्हती शासनातील काही अधिकारी आणि मा.अटर्नी जनरल यांनी चुकीची भुमिका घेऊन मागासवर्गीच्या विरोधात शासन निर्णय जारी केला आहे तो निर्णय लवकरात लवकर रद्द करून मागासवर्गीयांना न्याय द्या.

याप्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते मा.प्रमोदजी बागुल, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र सचिव रविभाऊ गांगुर्डे,जिल्हा नेते शिरीषभाई गांगुर्डे, युवा नेते किरण नाना दोंदे, आंबेडकर चळवळीतील युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.