विद्युत तारेच्या झटक्याने 2 शेळ्या ठार

19

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी वर्धा)मो:-9765486350

वर्धा(दि.3जून):-तालुक्यातील येसम्बा येथे विद्युत तारेच्या झटक्याने 2 शेळ्या मृत झाल्याची घटना घडली.

सुनील लक्षमराव धापूलक,मु येसंबा पोस्ट गोजी तालुका वर्धा यांचा शेळी पालनाचा व्यवसाय असून यांनी आपल्या शेळ्या श्री रमेश हुके यांच्या शेतात चारण्यासाठी गेले असता , विद्युत तार तुटून असल्यामुळे त्यांच्या 1 शेळी व1 बोकुड यांना विद्युत पुरवठेचा झटका बसला.

दोन्ही शेळ्याची अंदाजे किंमत 55 हजार रुपये आहे. शेळीपालन श्री सुनील धापूलकर यांना पण विद्युत पुरवठेचा झटका बसला ते थोडक्यात बचावले.प्राप्त माहितीनुसार विद्युत ताराची तक्रार 1महिन्या अगोदर केलेली होती, तरी त्यांनी दुलक्ष केले , तरी mseb ऑफिस चे उडवा उडवी चे उत्तर दिले असे सांगण्यात येते.