युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

23

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.4जून):-उपकेंद्र चायगाव येथे युवासेना जिल्हाध्यक्ष मा. ऋषिभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना विभाग प्रमुख धनंजय देशमुख तसेच युवानेते मुकेश प्रभाकर देशमुख यांनी गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजीत केले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मगर सर यांनी गर्भवती महिलांना मार्गदर्शन केले व स्त्री रोग तज्ञ डॉ. कानोडजे सर मेहकर यांनी महिलांना प्रशिक्षण देत जवळपास 25 गर्भवती महिलांची तपासणी केली. तसेच लॅब टेक्निसिअन उकंडे सर यांनी गर्भवती महिलांची रक्त तपासणी केली यात त्यांनी हिमोग्लोबिन, एच. आई. व्ही. व थायरॉईटची तपासणी केली.तसेच आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. होणे मॅडम यांनी गर्भवती महिलांना पोषक आहार व गर्भसंस्कारांबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता आरोग्य सेविका सौ. भुरकाडे मॅडम तसेच आरोग्य मदतनीस सौ मोरे मॅडम यांनी अतोनात प्रयत्न केले. यावेळी शिवसेना युवानेते निरजभाऊ रायमुलकर, जिल्हापरिषद सदस्य संतोष चनखोरे, पंचायत समिती सदस्य भुजंगराव म्हस्के, युवासेना तालुकाध्यक्ष भूषणभाऊ घोडे, चायगावचे सरपंच भारत अण्णा राहाटे, ग्रा.पं. सदस्य गजानन देशमुख, किशोर अवघडे, मिलिंद मोरे, शिवाजी देशमुख, तलाठी तांबेकर साहेब, शिवसेना नेते भगवानराव सहाणे, प्रभाकरराव देशमुख, रमेशराव देशमुख, गणेश चैताने, किशोर देशमुख, विजय देशमुख आदी उपस्थित होते. तसेच सूत्रसंचालन गजानन ढगे तर आभार प्रदर्शन युवासेना विभाग प्रमुख धनंजय देशमुख यांनी केले.