राष्ट्र सेवा दल व शिक्षक भारतीतर्फे रुग्णांना फळवाटप व मास्क वितरण

17

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.4जून):-राष्ट्र सेवा दलाच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्र सेवा दल चंद्रपूरतर्फे उपजिल्हा रुग्णालय,चिमूर येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.४ जून राष्ट्र सेवा दलाचा स्थापना दिन.सेवा दलाच्या स्थापना दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीतून रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.गेडाम,राष्ट्र सेवा दलाचे तथा शिक्षक भारतीचे सुरेश डांगे,राष्ट्र सेवा दल कार्यकारिणी सदस्य इम्रान कुरेशी,शिक्षक भारती विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे,जिल्हा सल्लागार धनराज गेडाम,विशेष शाळा जिल्हा सचिव रामदास कामडी,चिमूर तालुका अध्यक्ष रावन शेरकुरे,रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

कोविड सेंटर,चिमूर येथे डॉ.अश्विन अगडे यांचे उपस्थितीत रुग्णांना फळवाटप करण्यात आले.चिमूर येथे नागरिकांना मास्कचे वितरण करण्यात आले.मास्कची आवश्यकता,शारिरिक अंतर व वारंवार हात धुणे यांवर नागरिकांना माहिती देण्यात आली.