कृषी कार्यालय गोंडपिपरी अंतर्गत चेक पारगाव येथे खतांचे वाटप

41

✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.6जून):- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर “शेतकरी गटांना बांधावर खत पुरवठा मोहीम” अंतर्गत तालुका कृषी कार्यालय, गोंडपिपरी अंतर्गत मौजा चेकपारगाव येथील एकता सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरुष बचत गटामार्फत रासायनिक खत खरेदी करण्यात आले. यामध्ये युरिया, एस.एस.पी., ग्रोमर इ. एकूण जवळपास 40 टन खत या मोहिम अंतर्गत गौरव ऑग्रो ट्रेडर्स, भंगाराम तळोधी येथून खरेदी करण्यात आले.

यावेळी गटाचे गट प्रमुख श्री. पंकज विरुटकर व सचिव भाऊराव ढवस तसेच कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी धाबा गोल्हाइत साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री. टोंगलवार साहेब, कृषी सहाय्यक श्री. पेंदोर साहेब, कृषी केंद्र मालक श्री. गौरव गोनपल्लीवार उपस्थित होते.”शेतकरी गटांना बांधावर खत पुरवठा मोहीम” ही मोहीम तालुका कृषी अधिकारी श्री. मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.