श्री भगवान महाराज यांचा अमृत महोत्सवी जन्मदिन व पाण्याच्या टाकीचे आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते भूमिपूजन

61

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मेहकर(दि.6जून):- सिद्धांत आश्रम वरवंड चे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य श्री भगवान महाराजांच्या 75 वा वाढदिवस अमृतमहोत्सवा निमित्त क्रीडा विभाग बुलडाणा यांचेकडून मंजूर पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन लोकप्रतिनिधि संजयजी रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात श्री भगवान महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा केक कापून करण्यात आला. आमदार साहेबांनी सहकुटुंब महाराजांचा वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ व कपडे देऊन सत्कार केला व ५१०००/रुपयाची रोख रक्कम संस्थेच्या विकास कामासाठी भेट दिली.

याप्रसंगी सहदेवराव अल्हाट (माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर),तेजराव जाधव (जिल्हा परिषद सदस्य),सुपाजी पायघन (पंचायत समिती सदस्य), संतोष साखरे (सरपंचपती वरवंड),श्याम भाऊ जोशी,युवा नेते निरज रायमुलकर,रंजनाताई रायमुलकर ,डॉ नयन ताई रायमुलकर,तसेच सिद्धांत आश्रम वरवंडचे संचालक मंडळ डॉ उद्धवराव आव्हाळे, मनोहर मवाळ,अनिल शेवाळे,बळीरामजी मुके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,वसतिगृह अधिक्षक,वसतिगृह कर्मचारी यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सामूहिक सत्कार केला व उपस्थित मान्यवरांनी महाराजांचा वाढदिवसानिमित्त शाल व बुके देऊन सत्कार करून केला.

या कार्यक्रमास प्रमोद पाटील,श्रीकृष्ण गुरळकर उपसरपंच वरवंड,कैलास तानकर ,केशवराव ढोरे ,विलास आल्हाट ,अरविंद देशमुख, निलेश गुरळकर, संजय बारडेकर ,अशोक हरमकर, रामेश्वर जावळे ,हरिश्चंद्र डवंगे, वामनराव आखुड, दिलीप अल्हाट ,दौलत डवंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन संदीप राठोड यांनी केले व उपस्थिताचे आभार मुख्याध्यापक देवेंद्र पदमने यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री रामदास गोळे जनार्धन बोरे विनोद वानखेडे संजय वानखेडे भिकाजी बोराडे ज्ञानेश्वर सुरडकर रुपेश ढोरे यांनी परिश्रम घेतले.