पोलिसांनी मारली गावठी दारू काढणाऱ्या भट्टीवर धाड़

43

🔺सुमारे १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.7जून):-येथून जवळच असलेल्या खैराटी (पारधी बेडा) येथे हिंगणघाट पोलिसांच्या वतीने गावठी दारू काढणाऱ्या भट्टीवर धाड़ घालून सुमारे १ लाख २८ हजार रुपये किमतीची दारू व इतर साहित्य जप्त करीत वॉश-आउट मोहीमेंतर्गत कारवाई करण्यात आली.

मोहीमेदरम्यान ८ लोखंडी ड्रम मध्ये रुपये २ हजार किमतीचा ५० लिटर मोहा सडवा 8 हजार रुपये किमतीचे लोखंडी ड्रम,१० लोखंडी ड्रम मध्ये प्रत्येकी १०० लिटर प्रमाने १ हजार लिटर मोहा सडवा किंमत १ लाख रूपये, १० लोखंडी ड्राम किंमत १० हजार रूपये,गावठी मोहा दारु ५० लिटर किंमत कॅंन सह ६ हजार रूपये तसेच ईतर दारु भट्टी साहीत्यअसा एकुण १ लाख २८ हजार रूपये किमतीचा माल नष्ट करण्यात आला.

सदर कारवाई ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहवा विवेक बंसोड़, सुहास चांदोरे, पंकज घोडे,प्रशांत वाटखेडे, उमेश वेले या चमुने केली.