ग्रामगीता महाविद्यालयात वृक्षारोपण

29

✒️सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.7जून):-जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजना, वनस्पती शास्त्र विभाग व पर्यावरण शास्त्र विभागाचे वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

महाविद्यालय परिसरात वड, पिंपळ, यासह रिठा,आवळा,करंजी,गुलमोहर, यासारख्या औषधी वनस्पती ची रोपे लाऊन त्यांचे संकल्पपूर्वक जतन करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली.यावेळी प्राचार्य डॉ. अमीर धमानी,नॅक समव्यक प्रा. हुमेशवर आनंदे,वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.मृणाल वऱ्हाडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बिजनकुमार शिल, पर्यावरण विभागाचे प्रा.माणिक उपस्थित होते. यावेळी कोविड नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले.