कोरोनाच्या नावाखाली माझ्या वडिलांचा घातपात होण्याची शक्यता :सुरेश वाघमारे

115

🔺भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णायातील धक्कादायक प्रकार

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई{दि.9जून}:-दिनांक 18 मे २०२१रोजी रुग्ण शिवाजी आनंदा वाघमारे वय 65 वर्षे यांना कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालयात छातीमध्ये थोडे दूखू  लागल्यामुळे त्याना रुग्णालयात प्रथम मजल्यावर दाखल केले. रुग्ण दाखल करतेवेळी अजिबात गंभीर नव्हते मात्र नन्तर अति दक्षता वैधकीय विभाग मध्ये भरती केले असता रुग्ण शिवाजी वाघमारे याना कुठलाही आजार नसून त्याना श्वसन चा त्रास होऊ लागल्यामुळे त्याना एम आय सी यू  मध्ये 19 मे 2021 ला दाखल केले मात्र लवकरच त्याना ओ टु 15 वर ठेवण्यात आले त्याना एस आय सी यू  मध्ये दिनांक 4 मे 2021 रोजी दाखल करण्यात आले.

3 मे २०२१रोजी शिवाजी वाघमारे यांचा कोवीड रिपोर्ट निगेटिव्ह आला होता म्हणून त्याना डॉ देवेंद्र यांनी एस आय सी यू  मध्ये हलविण्यात आले होते. मीच त्यांची ट्रेंटमेन्ट करणार आहे असे डॉ. देवेंद्र ने सांगितले मात्र शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागातील घृणास्पद आम्हाला आलेला अनुभव खूप वाईट असून या ठिकाणी काही कामगार व नर्स यांच्याकडून रुग्णाची खूपच हेळसांड व पिळवणु होत असून येथील कोरोना रुग्ण अत्यन्त वाईट परिस्थिती मधून आपला जीवास मुकत आहेत. वेळेवर रुग्णाला एकतर जेवण मिळत नाही, रुग्णाला शौचास झाल्यास त्याला डायपर बदली मिळत नाही. रुग्णाच्या नातेवाईकांना सर्व महागडी रक्त नमुना चाचणी खासगी मध्ये करायला सांगतात.

बाहेरून गोळ्या औषध इतर रूग्ण संबंधित उपकरण विकत आणायला सांगतात .यांची मुजोरी एव्ह्ड्यावरच थांबत नाही तर नातेवाईकांशी उद्धटपणे बोलतात. आजाद समाज पार्टी चे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार आंबेडकरी चळवळीतील आंदोलनकारी नेतृत्व सुरेश वाघमारे यांनी कथन केलेला हा कांदिवली येथील रुग्णालयातील धक्कादायक व प्रकार उघडकीस आणला असून याबाबत त्यानी सी बी आय मार्फत कसून चौकशी करण्याची मागणी केली असून रुग्णाच्या जीवितास जाणीवपूर्वक औषोधोपचार न करता त्यांच्या जीवाशी खेळ होत असून येथील कोरोना रुग्णांचा मूर्त्यू  दर जास्त असून या रुग्णालयात गेल्या महिन्या भरापासून रुग्णालय अधीक्षक प्रतिभा पाटील या रजेवर असून येथील आरोग्य सेवा टांगणीला लावून रुग्णांचा अतोनात छळ या ठिकाणी कोरोनाच्या नावाखाली होत आहे. रुग्ण शिवाजी वाघमारे यांची प्रकृती चांगली झाली असून त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. देवेंद्र यांना विचारले असता आमचे रुग्ण खाली पहिल्या मजल्यावर सर्वसाधारण कक्ष म्हणजे कोव्हीड कक्ष मध्ये दिनांक 8 जुन २०२१रोजी दुपारी दाखल केले.

असून त्याना लघवी रक्त स्वरूपाची येत असून याबद्दल डॉ.देवेंद्र यांना विचारणा केली असता इंजेक्शन मुळे होत असावी. त्यामुळे त्याचें इंजेक्शन बंद करून आपणास ३ दिवसात सुट्टी देतो असे सांगिलते मात्र एस आय सी यू  विभागाने शिवाजी वाघमारे यांचा दिनांक 5 मे 2021 रोजी स्वाब घेतला असून त्यांची आर टी पी सी आर चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने त्याना पहिल्या मजल्यात दाखल करत आहोत असे एम ओ कार्यालयात समजले. या बद्दल डॉ. देवेंद्र नि मला याबाबदल माहित नसून माझ्याकडे तर असं काही रिपोर्ट आला नसल्याचे सप्ष्ट सांगितले , रुग्णालयातील मतभिन्नतेबद्दल प्रश्नचिह्न निर्माण होतो जे डॉक्टर रुग्णास औषोधोपचार करतात त्यानाच कोरोना रिपोर्ट बद्दल माहिती नसत परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे रुग्णावर उपचार योग्य रित्या होत नसून या ठिकाणी शिकाऊ डॉक्टर व नर्स आणि वॉर्डबॉय मावशी याच्या बेजबाबदार पणामुळे रुग्ण यांच्या आरोग्यावर उलटे परिणाम होऊन मुर्त्यू  ओढवतो एकदा स्थिर रुग्ण होऊन सर्वसाधारण मध्ये गेल्यावर सुद्धा पुन्हा येरे माझ्या मागल्या पुन्हा आय सी यू  मध्ये दाखल करतात आणि योग्य उपचार अभावी रुग्ण दगावतात मात्र डॉक्टरांकडून त्याना व्हेंटीवर अटॅक आला.

आणि ते मुर्त्यू  पावले असे उत्तर मिळते आज रेमिडिशीवर आहे लस उपलब्ध आहे विविध गोळ्या उपलब्ध आहेत तरीपण चांगले रुग्ण दगावत असल्याचा भयानक प्रकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालयात होत असून या गंभीर बाबींची चौकशी तज्ञ डॉक्टर टास्क फोर्स समिती नेमून खाते निहाय सी बी आय मार्फत तात्काळ चौकशी करण्यात यावी व रुग्ण का दगावतात याची माहिती करून संबंधितांना निलंबित करून त्याना कडक शासन व्हावे कारण एकदा पॉझिटिव्ह झालेला रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्यावर त्याला नॉन कोव्हीड मध्ये दाखल केल्यानंतर एका दिवसात तो रुग्ण पॉझिटिव्ह कसा होऊ शकतो कारण रुग्णावर झालेल्या औषोधोपचार मुळे किमान काही दिवस तरी त्याच्या शरीरामध्ये कोरोनाला रोखण्याची शक्ती निर्माण झालेली असते याबद्दल मनपा प्रशासन सुद्धा अनभिज्ञ असते याची कमालीची गंमत वाटते रुग्णालयायील कर्मचाऱ्यांसाठी तो केवळ पेशन्ट असते मात्र रुग्णांच्या घरच्यांसाठी ते आपला जिव कि प्राण असतो.

दिनांक 5 मे २०२१रोजी सकाळी सुमारें 5 वाजता एस आय सी यू  मधील मुजोरीचा प्रकार नर्स ने तुम्ही डायपर दुकानातून आणून तुम्ही स्वतः ते साफ करा इकडे आम्ही नोकर नाही, असे स्पष्ट उत्तर स्टाफ नर्स कडून सुरेश वाघमारे याना मिळाले नाविलाजने बाहेरून डायपर आणून रुग्णाची स्वछता वाघमारे कुटुंबियांना करावी लागत असे या वेळी तिथे उपस्थित केयर टेकर ने तुम्हाला एकदा सांगितलेले समजत नाही का तुम्ही साफ करायच रोज अत्यन्त मग्रूर रिने शब्द प्रयोग करून ओरडत बोलला मात्र वाघमारे यांनी नाविलाजाने हा मनस्ताप निमूटपणे सहन केला कारण रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून रुग्णालयातून सुट्टी मिळणाऱ्या शिवाजी वाघमारे या रुग्णास एकाच दिवसात पॉझिटिव्ह दाखवून कोव्हीड कक्ष मध्ये दाखल करून त्याना जर्जर करून मारण्याचा कुटील डाव डॉ.प्रतिभा पाटील व अजय गुप्ता सह इतर अधिकाऱयांचा दिसून येत असून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याना पहिल्या मजल्यावर एकत्र केले असून विलगीकरणाचे इथे सर्रास तीन तेरा वाजलेले आहेत या प्रकरणी संतप्त झालेले उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी येथील काही कामगारांच्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धंनजय मुंडे .जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र महिला प्रमुख यांना रुग्णालयात बोलावून लोकसमस्या वर आवाज उठविल्यामुळे जाणीवपूर्वक माझ्या वडिलांना योग्य उपचार मिळत नाही.

एस आय सी यू  मध्ये ऑक्सिजन लेव्हल 100 पूर्ण होऊन बाटला शुन्य झालेला असताना सुद्धा तेथील शिकाऊ नर्स ने ७वर केला रुग्णास स्वास घेण्यास काहीही त्रास नसताना सुद्धा मुद्दाम वाढवून ठेवला याबाबदल डॉ.देवेंद्र यांनी विचारले कुणी वाढवला नन्तर त्यानी स्वतः 3 लिटर वर केला आता सद्य स्थितीत त्याना सर्वसाधारण वॉर्ड मध्ये दाखल केले असून त्यांचा बेड क्रमांक 36 हा आहे मात्र दुखणं एकीकडे आणि उपचार वेगळे असा सावळा प्रकार या ठिकाणी चालू  आहे कोरोनाच्या नावाखाली कुटूंबियांना दबावतंत्र निर्माण करून जेरीस आणण्याचा प्रकार असून अदयाप त्यांच्या रक्त स्वरूपाची होणाऱ्या लघवी बद्दल व त्यांच्या प्रकृतीबद्दल काहीही माहिती मिळाली नसून येथील आरोग्य सेवा वाऱ्यावर चालत असून यापूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे रुग्ण दगावल्याचे प्रकार झालेले आहेत त्यामुळे माझ्या वडिलांचा सुद्धा इतर रुंगाप्रमाणे घातपात होऊ शकतो म्हणून सदर प्रकरणाची चौकशी सी बी आय मार्फत करण्याची मागणी आजाद समाज पार्टी चे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व गृहमंत्री याना मेल द्वारे केली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱयांना तात्काळ निलंबित करावे व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव बदनाम करून रुग्णालय बंद पाडण्याचे कूट कारस्थान हाणून पाडण्यासाठी आंबेडकरी संस्था संघटन या प्रकरणीभव्य मोर्चा, जनांदोलन करणार असून विविध संस्था संघटना व सर्वपक्षीय जनआंदोलन उभारणार असल्याचे सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे सांगितले आहे