सर्व आंबेडकरी गटांनी एकत्रित येऊन डेमोक्रॅटिक रिपाई पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांना नेतृत्व द्यावे – डॉ. राजन माकणीकर

28

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.9जून):- देशासह राज्यात जातीय अराजकता निर्माण झाली असून संविधानिक भारत व समाजरचना शाबीत ठेवण्यासाठी आंबेडकरी गटातटातील समूहाने एकत्रित येऊन अभ्यासू व्यक्तिमत्व कनिष्क कांबळे यांच्या कडे नेतृत्वाची कमान द्यावी असे मत विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.*

जगासह, देशाला आंबेडकर विचार फार पोषक असून मनुवादी विचार आंबेडकरी विचार सत्ता व संपत्तीच्या जोरावर दाबू पाहात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान या मनूच्या औलादिना मान्य नसून क्षणाक्षणाला पायमल्ली केली जात आहे हे सर्वांना सर्वांना ज्ञात आहे.

राजकारणात अमुलाग्र बदल होणे हे फार गरजेचे असून जोपर्यंत आंबेडकरी विचारधारेचे लोक, पक्ष, संघटना, संस्था व समूह एकत्र येत नाहीत तोपर्यंत सत्तेचे समीकरण आंबेडकर विचारधारेच्या व्यक्तीकडे येवु शकणार नाही.

बहुजन हृद्यसम्राट, आदरणीय, श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर, संघर्षनायक केंद्रीय मंत्री रामदास आठवले, लॉंगमार्च प्रनेते प्रा. कवाडेसरानी आणि मातब्बर आंबेडकरी नेत्यांनी आपल्या राजकारणातला प्रदीर्घ अनुभव युवा आंबेडकरी नेतृव निर्मितीस दिला तर आंबेडकरी नेतृत्व खऱ्या अर्थाने उदयास येईल अस ही माकणीकरांना वाटत असल्याचे बोलून दाखवले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी राजकारणात प्रखरतेणे लक्ष घालून राज्यातील समविचारी सर्वांना एकत्र आणून राजगृहाने त्यांना मार्गदर्शन व आशीर्वाद देऊन युवा नेतृवाला उभारणी द्यावी जेणेकरून राज्यासह देशाची बुडती व्यवस्था वाचू शकेल. असा आशावाद डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

मनुची पिलावळ व त्याच्या दलालांनी आंबेडकर घराण्याला सातत्याने बदनाम करून सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणात नेहमी अडथळे आणून अटकाव केला आहे, मागील निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा करून आंबेडकरी विचारांचा फडशा पाडण्यात आला. आता तरी सर्वांनी एकत्र येऊन अश्या गोष्टीवर मात देऊन स्वतःला सावरण्याची वेळ आली आहे.

कनिष्क कांबळे यांच्या नावाला सर्व-सामान्यातून पसंती येत आहे, ते उच्चविद्याविभूषित आहेत, आंबेडकरी तत्व व घराण्याशी निष्ठावंत असलेल्या आणि महाराष्ट्र गाजवलेल्या पँथर आ. टी. एम. कांबळे यांचे सुपुत्र आहेत, अश्या पँथर पुत्राला आंबेडकरी समूहाने एकत्रित येऊन जेष्ठ आंबेडकरी राजकीय प्रमुखांनी त्यांना मार्गदर्शन करावेत व आशीर्वाद द्यावेत अशी इच्छा पक्षाचेच राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे व्यक्त केली.