समाजसेवेचा वसा घेऊन आयुष्यभर कार्य करणारे सच्चे कोरोना योद्धा धाकतोड गुरुजींची मातृभूमित दखल !

35

✒️कारंजा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कारंजा ( लाड )(दि.10जून):- बाल वयापासूनच, मित्रमंडळींचा गोतावळा जमवून, विविध संघटनांद्वारे कोणतेही सामाजीक ऊपक्रम असो सार्वजनिक कार्यक्रम असो सातत्याने अग्रेसर असलेले, किशोर मधुकरराव धाकतोड गुरुजी यांना, दैनिक मातृभूमि समूहाने , यंदाचा *कोरोना योद्धा – पुरस्कार* जाहिर करून त्यांचा सन्मान केल्याबदल स्थानिक विदर्भ लोक कलावंत संघटना तथा महाराष्ट्र ग्रामिण पत्रकार परिषद जिल्हा शाखा, वाशिम कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे . सविस्तर वृत्त असे की, कारंजा येथील रहिवाशी असलेले किशोर धाकतोड हे ज्ञानप्रकाश तांत्रिक विद्यालय, पिंजर येथे अध्यापक म्हणून कार्यरत असून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत .

समाजातील अपघात आणि दुर्धर आजार ग्रस्तांची संख्या व त्यांचे प्राण वाचविण्याकरीता रक्ताची असलेली गरज ओळखून, किशोर धाकतोड यांनी आयुष्यभर रक्तदान करण्याचा वसा घेतला आहे .त्यांनी स्वत: आजपर्यंत ६० वेळा रक्तदान करुन कारंजा तालुक्यात विक्रम केला आहे . त्यासोबतच इतर मित्रमंडळीना जिव्हाळा लाऊन रक्तदाना करीता वळवितांना त्याची सुरुवात धाकतोड गुरुजी यांनी स्वतःचे घरापासून आणि कुटूंबापासून केली आहे . हा खरोखरीच चिंतनाचा विषय असून, गौरवास्पद बाब आहे मानवसेवेकरीता रक्तदान-श्रेष्ठदान मानून गुरुजींनी, कारंजा तालुक्यात जिव्हाळा – परिवार स्थापन केला .त्या माध्यमातून त्यांची अनेक सेवाभावी कार्ये सुरु असतांनाच गेल्या वर्षाच्या, मार्च २१ पासून कोरोना महाभयंकर महामारी आली . या काळात त्यांनी अक्षरशः स्वतःचे घरावर तुळशीपत्र ठेऊन, समाजाची, बाहेरगावच्या गरजू मजूरांची निस्वार्थपणे सेवा केली .

त्यामध्ये पुरीभाजीची पाकीटे,अन्नधान्य,गरजुंना कपडे वाटप , आवश्यक मजुराला बाहेरगावी उत्तर प्रदेश, गुजरातला जाण्याकरीता आर्थीक सहकार्य देऊन खऱ्या अर्थाने मदतीचा हात दिला. ,कुणीही आवाज द्या . हजरजवाबीपणाने धावुन जाणारे असे अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेले किशोर धाकतोड गुरुजी, शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना, दिव्यांगाना वेळोवेळी शालेय पुस्तके, गणवेशा करीता मदत, ग्रामस्थांना सहकार्य करीत असल्यामुळे विद्यार्थाचे ते लाडके अध्यापक आहेत . प्रयोगात्मक अध्यापनामुळे विद्यार्थी त्यांच्या तासिकेला आवर्जून हजर असतात . सध्या भ्रमणध्वनीद्वारे २४ तास विद्यार्थाच्या संपर्कात ऑनलाईन राहून ते अध्यापनाचे धडे गिरवून घेत असतात असे धार्मीक ,मनमिळावु ,सेवाकार्याचे व्रत घेतलेले व्यक्तीमत्व , वृक्ष संवर्धनासाठी ,परिसरातील समस्या निवारण्यासाठी पुढाकार,सद्यस्थितीत “लस”घेण्यासाठी त्यांची जन जाग्रुती जिव्हाळा चे माध्यमातून सुरु आहेच.

अशा आदर्श व्यक्तीमत्वाची दै.मातुभुमी तर्फे, वाशिम आवृत्ती संपादक – निलेश सोमाणी, विभागीय प्रमुख – अशोक इन्नानी, तालुका प्रतिनिधी समिर देशपांडे, शहर प्रतिनिधी – अमोल अघम यांनी,*कोरोना योद्धा* ह्या पुरस्कारा करीता निवड केल्या बदल, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेतर्फे, जिल्हाध्यक्ष, संजय कडोळे, अ.भा नाट्य परिषद मुंबई तर्फे नंदकिशोर कव्हळकर, पांडूरंग माने, मोहित जोहरापूरकर, गुरुदेव नागरी सह पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक – अतुल धाकतोड, अयोध्या रथयात्रेचे कारसेवक – उमेश अनासाने, गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे आजिवन प्रचारक – विजय पाटील खंडार यांनी अभिनंदन केले आहे .