कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटुंबियांचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले सांत्वन

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.10जून):- कोरोनाचा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लोक मृत्यू पावले आहे. त्यामुळे कुटुंबातील करता माणूस किंवा दोन्ही मृत्यू पावल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. वरोरा तालुक्यातील कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी याप्रसंगी रवींद्र धोपटे, सभापती पं.स.वरोरा, मिलिंद भोयर वरोरा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, विशाल बदखल , प्रफुल आसुटकर, निखिल हिवरकर उपस्थित होते.

मतदार संघात कोणत्याच व्यक्तीवर संकट कोसळले तर धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून धानोरकर दाम्पत्यांची ओळख आहे. आज देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रत्यक्ष कोरोना प्रादुर्भावाने मुत्यू झालेल्या आमडी, वडगाव, मढेळी, खरवड, आशी, जामखुला, येवती, वाघनख, दहेगाव या गावातील कोरोना प्रादुर्भावाने मुत्यू झालेल्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.