पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीसह त्यांचे संगोपन गरजेचे – समतादुत गाडेकर गुरूनाथ

25

✒️वसमत(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वसमत(दि.10जून):- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीसह त्यांचे संगोपन करणे गरजेचे असून सद्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असल्याने प्रत्येकांनी वृक्षारोपण करावे असे आवाहन समतादुत गाडेकर गुरूनाथ यांनी व्यक्त केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन अंगीकृत स्वायत्त संस्था असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ,पूणे समतादूत प्रकल्प तालुका वसमर जि.हींगोली वतिने ता.वसमत,जि.हिंगोली व आंबेडकर नगर महादेव मंदिर परिसर अंगणवाडी शाळा क्रमांक 6 व येथे ग्रा.प.गिरगाव आज पर्यावरण दिनी वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पूढे बोलतांना
म्हणाले की, पर्यावरणाच्या समतोलासाठी निश्चितच वृक्षलागवडीसह त्यांचे संगोपन अत्यावश्यक आहे त्यातूनच प्राणवायू मिळतो मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच सद्यस्थितीत जगभरात कोरोना महामारीच्या अनुषंगाने रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासल्याने प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीची वेळ आलेली आहे.म्हणूनच आगामी काळात विशेषतः नैसर्गिकरित्या प्राणवायू मिळवण्यासाठी प्रत्येकांनी वृक्षारोपण व त्यांचे संगोपणाचा कर्तत्व म्हणून संकल्प करावा व यासाठी तत्पर असावे असेही यावेळी म्हणाले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फळे व फुलझाडे आदींचे वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी मिलिंद आळणे गुरु नाथ गाडेकर आनंद कुटे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.