रात्रीचे अंधारात प्रशासनाचे सहकार्याने रेतीचोरी

26

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.११जून):-अवैध रेतीवाहतुक तसेच रेतीचोरी प्रकरणी सततच्या बातम्या प्रकाशित होऊनही रेतीतस्कर आपला रेतीचोरिचा व्यवसाय बीनदिक्कतपणे करीत असल्याचे दिसुन येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांपासून तर सर्वच अधिकारी अवैध रेतीव्यवसाय बंद करण्याचा दावा करीत असले तरीही लाखो रूपयांची चिरिमिरी मिळत असल्याने पोलिस यंत्रणा,परिवहन खाते तसेच महसुल खाते यांचे आशिर्वादाने रात्रीचे अंधारात हा रेतीचोरिचा खेळ अविरत सुरुच असल्याचे दिसुन येत आहे.परवा दि.९ रोजी रात्री हिंगणघाट शहरात असाच एक प्रकार घडला.

रात्री ८.३० चे दरम्यान शासकीय यंत्रणेने स्थानिक रेतीव्यापारी खियानी यांचा रेतीने भरलेला डंपर अडविला.कारवाईसाठी सदर डंपर हिंगणघाट बस स्थानकाचे परिसरात आणला गेला.यावेळी शासकीय अधिकारी आपल्या वाहनासह तेथे पोचले,परंतु ४० हजार रूपयांची सरकारी खात्यात दक्षिणा चढ़विल्यावर सदर डंपर सोडण्यात आला.

सदर शासन अधिकाऱ्यांनी आपल्या सरंक्षणात रेती भरलेला डंपर तेथून पाठविल्यानंतर आपल्या शासकीय वाहनाने ते सुद्धा पसार झाले.अधिक माहिती घेतली असता डंपरमधे भरलेल्या जवळपास २५ टन रेतीची रॉयल्टी त्यांचेकड़े नव्हती.
झालेल्या प्रकाराची जोरदार चर्चा रेती व्यावसायिक वर्तुळात होत असून काही जागृत नागरिक याची तक्रार थेट मंत्रालयात पुराव्यासह करणार आहेत