चिमूर नगर परिषद ने दोन वर्षांचा घर व पाणी कर माफ करा- युवक कांग्रेस चे पप्पु शेख यांची मागणी

26

🔸पप्पू शेख यांच्या मागणीला मिळत आहे जनसमर्थन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.12जून):- नगर परिषद ची घर व पाणी पट्टी कर ची वसुली असून मागील दोन वर्षापासून कोविड 19 मुळे लाकडाऊन घोषित असल्याने जनतेचे व्यवसाय धंदे बंद होते आर्थिक व्यवस्था बंद होती त्यामुळे नगर परिषद ने कर वसुली न करता सरसकट माफ करण्याची मागणी युवक कांग्रेस चे पप्पू शेख यांनी केली आहे

कोविड 19 मुळे लॉकडाऊन घोषित केल्यानंतर आजच्या स्थितीत पूर्ण पणे अनलॉक झालेली नाही व्यवसायिक, मजूर वर्ग यांची आवक व्यवस्था बंद आहे आर्थिक स्थिती नाजूक होत चाललेली आहे

सन 2020 ते 2022 या दोन वर्षात सामान्य नागरिक जीव मुठीत ठेवून जगत होता आणि जगत आहे तेव्हा चिमूर नगर परिषद चा घर व पाणी पट्टी कर भरणे अवघड ठरत आहे चिमूर नगर परिषद ने सन 2020 ते 2022 चा घर व पाणी पट्टी कर माफ करण्याची मागणी युवक कांग्रेस चे पप्पु शेख यांनी केलेली आहे.