विद्यार्थ्यांनी रुक्ष संवर्धन करणे गरजेचे. डी.के. आरीकर

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.12जून):- पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लॉ कॉलेज जवळील पुढील जागेत वृक्ष रोपन करण्यात आले. आणि पुढे काही उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीं चा सत्कार करण्यात आला. त्यात पर्यावरण मित्र पर्यावरण रत्न म्हणून अविनाश टिपले जेष्ठ पत्रकार चंद्रपूर याना पर्यावरण संवर्धन संदर्भात तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनिय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. त्यात माणिकराव लोनकर, रजनी मोरे, वैशाली रोहनकर, विजय भोगेकर, डी.बी.बेलखेडे यांचा ही सत्कार करून यांना ही सन्मान पत्र देण्यात आले. सोबतच डॉ, अमित जयस्वाल, डॉ गजेंद्र गणवीर, विजय नरेश बोरीकर यांना कोविध योद्धा म्हणून कोरोना काळात उल्लेख निय कार्याबद्दल प्रदान सन्मान करण्यात आले. राणी राव, माया पटले, संक्षिप्ता सिंधे, यांना सामाजिक कार्यासाठी देण्यात आला.

हा पुरस्कार पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूर आणि महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळ चंद्रपूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमच्या विचारमंचावर, डी.के. आरिकर, अॅड हिराचन्द्र बोरकुटे, हरीश सासनकर, डॉ कन्नाके उपस्थित होते.त्यांच्या हस्ते पर्यावरण मित्र पर्यावरण रत्नपुरस्कार प्रज्ञान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अमित आडे टिपलेवार यांनी तर प्रास्ताविक आणि आभार हरीश ससणकर यांनी मानले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक, माधव गुरूनुले, रंजना नाकतोडे, निखिल तांबोळी, पुरुषोत्तम राऊत, वनश्री मेश्राम, रेखा जाधव, अशोक मुसळे, विजय रोहन कर, रंजना आरिकर यांनी सहकार्य केले.