अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा मृत्यु

28

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१२जून):-हिंगणघाट शहरातून बाजार व शेतीपयोगी साहित्य खरेदी करुन मोटरसायकल क्र.एमएच ३४-एएल-१४५८ ने गावी निघालेल्या मोटरसायकलस्वाराचा अपघात झाल्याने घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना सकाळी तालुक्यातील मानोरा शिवारात घडली.मृतकाची इसमाची आकाश सर्जेराव कुमरे(२६) रा.नागरी जि.चंद्रपुर अशी ओळख पटली असून अज्ञात मोटसायकल स्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने सदर मोटरसायकल स्वाराचा मृत्यु झाला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

आज शनिवारी सकाळी १०.१५ चे दरम्यान हिंगणघाट पोलिसांना मानोरा शिवारात सदर मोटरसायकलस्वार मृतावस्थेत पडून असल्याचे आढळले.पोलिस उपनिरीक्षक आगाशे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतकाचे शव स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.या प्रकरणी अज्ञात मोटरसायकलस्वार व्यक्तिविरोधात विविध कलमाअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आगाशे,पोहवा बंडू. महाकाळकर ,महेंद्र आकरे ,भारत बुटलेकर,पोशी रविंद्र कांबळे इत्यादि करीत आहे.