बोगस कारभाराला क्लिनचीट कशी?

37

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.12जून):- येथे दि. १०/०६/२०२१ला संध्याकाळी चारवाजेपासुन सुरु असलेली कार्यवाही रात्री दिडवाजे पर्यन्त
योगिराज फ्लोअर मिल च्यानावे चालु असलेल्या प्रकल्पामध्ये गोपाळनगर परिसरात चिखलीचा PSM Agri.Solutions Pro.Plant Khor Tq.Chikhli Dist. Buldhana.या नावे परवाना असलेल्या सिड कंपनीची बीजवाई प्रोसेसिंग व पॅकिंग खामगाव शहरीभागात सुरू असलेल्या केंद्रावर कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी नाईक बुलढाणा,पटेल साहेब ऊपविभागिय कृषी अधिकारी, गिरी साहेब तालुका कृषी अधिकारी यांनी छापा टाकून कार्यवाही सुरु केल्यानंतर महसुल चे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव व तहसिलदार डॉ शितल रसाळ यांनी केले सिल .केल्यानंतर हा ऊद्योग पुन्हा बोगस बियाणे प्रक्रिया निर्माण करणे सुरू करणार अशी माहिती मिळाली.

कृषी विभागाने PSM कंपनीच्या ऍग्रिमेंट च्या आधारावर सदर नितीन सुर्वे यांच्या योगीराज फ्लोअर मिल ला क्लीन चिट दिल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी दिली. परंतू फक्त ऍग्रिमेंट च्या आधारावर बियाणे बॅग ला पॅकिंग व टॅग लावता येतो का अशी चर्चा खामगाव मधील जाणकारां मध्ये सुरू आहे. अश्याप्रकारे अनेक कंपन्यांनी डुप्लिकेट बियाणांची बाहेरून पॅकिंग करून परस्पर विक्री केली तर शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होणार. आतापर्यंत प्रत्येक वर्षी अनेक शेतकऱ्यांनी बोगस बियाणे बाबत कृषी विभागाकडे तक्रारी केल्या परंतू कृषी विभागांनी कोणतीही ऍक्शन न घेता बियाणे कंपणीलाच क्लिन चिट दिल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. शेतकरी मात्र याचा बळी जातो. ह्या मागे काय षडयंत्र दडलेले आहे हे अद्याप कळू शकले नाही.
ह्या प्रकरणात वरिष्ठ चौकशी होऊन शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणे गरजेचे आहे. करण तो जगाचा पोशिंदा आहे अर्थातच तो ह्या क्लिन चिट देणाऱ्या अधिकाऱ्यांचाही पोशिंदा आहे हे त्यांनी विसरू नये. यावर शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या व उपभोक्त्यांच्या संघटना आवाज उचलतील का ह्याकडे अनेकांचे लक्ष लागून असल्याचे जनतेच्या चर्चेमधून समजत आहे.

*या कार्यवाहीत संशयाची सुई*

मिळाल्यावर यासाठी शेतकरी,शेतमजुर व कामगार संधटना यासह ईतर आंन्दोलन करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे,या अनधिक्रुत प्रक्रिया केंद्राला परवाना चिखली तालुक्याचा व ऊद्योग प्रक्रिया खामगाव तालुक्यात या प्रक्रिया केद्रावर बियाणे प्रक्रिया करिता लागणारी सरंक्षितता साधने नसल्याचे आढळुन आलेनंतरही हा योगिराज मिल मध्ये हि प्रक्रिया कोणाच्या आशिर्वादाने चालत आहे हि संशयाची वाटचाल दिसत आहे,आधिच आत्महत्या ग्रस्थ बुलढाणा जिल्हा अशी नोंद असलेला मागासलेला शेतकरी बांधवांना बियाणेच्या बँगवर पँकिंग व टँग लावण्याचा अधिकार बाहेर गावात होत असलेल्या ठिकाणी आहे का?

अशी चर्चा जनमानसात असतांना कोरडवाहु शेतीच्या भरोशावर वर्षभर ऊपजिवीका चालवितो त्या शेतकर्याच्या जिवावर बेतण्याचा प्रकार त्यात या नाव कुठल आन गाव कुठल या प्रक्रिया ऊद्योगाने शेतीऊद्योग परवाना कसा चालतो ?अशी चर्चा संपुर्ण ठिकाणी असतांना
काम दाखवायच कुठे करायच कुठे तेरी भी चुप और मेरी भी चुप असे तर बुलढाणा जिल्हा क्रुषी विभागाचे धोरण झाले नाहीना अशी चर्चा संपुर्ण जिल्ह्यात होत आहे.