ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे परळीत रा.काॅं.च्या वतीने ह्रदय स्वागत

34

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.12जून):-राज्याचे उर्जा मंत्री ना.नितिन राउत हे बीड जिल्हा दौ-यावर आलेले असताना परळीमध्ये त्यांचे विविध संघटना, संस्था, कार्यकर्ते यांनी स्वागत केले.बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या वतीने ही त्यांचा सत्कार करुन स्वागत करण्यात आले.राज्याचे उर्जा मंत्री ना.नितिन राउत हे परळीमध्ये आले.

असताना त्यांचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संजय दौण्ड, नगर परिषद गटनेते वाल्मीक कराड, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, सरचिटणीस अनंत इंगळे,ज्येष्ठनेते माधव ताटे,भीमराव डावरे, प्रा.शाम दासूद,रवि मुळे, सुभाष वाघमारे,यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.