तेंदूपत्ता घेऊन जाणारा ट्रक पडला वैनगंगा नदीत- दोघांचा जागीच मृत्यू

33

✒️राहुल डांगे (विशेष प्रतिनिधी)

आष्टी(दि.13जून):- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे तेंदूपत्त्याचे पोते वाहतूक करतांना आष्टी जवळ असलेल्या वैनगंगा नदीत ट्रक ( एम.एच.34 – बी. जि.6111) पडल्याची घटना घडली.
ही घटना दिनांक 13 जून रोजीच्या मध्यरात्री अंदाजे 12.30 वाजताच्या दरम्यानची असावी असा प्राथमिक अंदाज आहे
ट्रक मध्ये तीन व्यक्ती होते.

यातील एकाचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले तर दुसरा ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचार घेत आहे.

तिसरा व्यक्ती गाडीत दबून आहे की परस्पर फरार झाला याबाबत चर्चा होती,मात्र पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर त्याचेही प्रेत दिसले.या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती प्राप्त होताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पी.एस.आय.कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासला प्रारंभ केला आहे.